औरंगाबाद : नालगोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केलली आहे.महाराष्ट्राने विविध वयोगट व प्रकाराच्या सांघिक गटात मुलांमध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य व एक कास्यपदक जिंकले आहे. मुलींच्या सांघिक गटात २ सुवर्ण, २ रौप्य व एक कास्यपदक जिंकले आहे.विशेष म्हणजे औरंगाबादच्या खेळाडूंनीही पदकांची लयलूट केली आहे. त्यात औरंगाबादच्या शाकेर सय्यद याने सांघिक आणि वैयक्तिक, अशी एकूण दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार याने सांघिक सुवर्ण व वैयक्तिक रौप्यपदक जिंकले आहे. कशिष भराड, हर्षदा वंजारे, अभय शिंदे, दिग्विजय देशमुख यांनी सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. सानिका मोरे हिने सांघिक रौप्य, तर यश वाघ व वेदांत खैरनार यांनी सांघिक कास्यपदके जिंकली आहेत. खेळाडूंना अजिंक्य दुधारे, राजू शिंदे, सागर मगरे, विलास उदय डोंगरे, दिनेश वंजारे, अजय त्रिभुवन, स्वप्नील तांगडे, संतोष आवचार, सचिन बोर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे काम पाहत आहेत.या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, भारतीय तलवारबाजी संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 1:10 AM