औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या शालेय राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने सांघिक गटात वर्चस्व राखताना २ सुवर्ण, ३ रौप्य व एक कास्य जिंकताना पदकांचा षटकार मारला. महाराष्ट्राच्या १४ व १७ वर्षांखालील संघाने सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने रौप्यपदक पटकावले, तर १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने कास्यपदक जिंकले.मुलांचा १४ वर्षांखालील विजेतेपद पटकावणारा महाराष्ट्राचा संघ : सोहम मेहता, सन्नी यादव, ओम कर्वा, देवय मेहता, उदय पांडे. १७ वर्षांखालील मुलांचा संघ : दीपक मंडल, अविनाश यादव, इशान महाजन, कीनाथ सोनस, रितेश मांदवगड. रौप्यपदक जिंकणारे महाराष्ट्राचे संघ (१४ वर्षांखालील मुली) : सानिया जग्गी, आर्या पाटील, हिया जैन, गायत्री सुर्वे, जान्हवी भुजाडे. १७ वर्षांखालील मुली : मानवी जैन, अलौकी बोबडे, कादम्बरी पवार, प्रणोती मोरे. १९ वर्षांखालील मुली : भावना गोयल, अमृता काचोळे, इरा गोसावी, राधिका सी., आदिती लोहारीकर.कास्यपदक जिंकणारा १९ वर्षांखालील मुलांचा संघ : सुराज चांद, जयेश खडकीकर, अविनाश सप्रा, सचिन शिंदे.स्पर्धेचा अंतिम निकाल (१४ वर्षांखालील मुले) : १. महाराष्ट्र, २. चंदीगड, ३. आसाम. मुली : १. तामिळनाडू, २. महाराष्ट्र, ३. चंदीगड.१७ वर्षांखालील मुले : १. महाराष्ट्र, २. चंदीगड, ३. तामिळनाडू. मुली : १. तामिळनाडू, २. महाराष्ट्र, ३. चंदीगड.१९ वर्षांखालील मुली : १. तामिळनाडू, २. महाराष्ट्र, ३. चंदीगड. मुले : १. चंदीगड, २. तामिळनाडू, ३. महाराष्ट्र.
राष्ट्रीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने मारला पदकांचा षटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:52 AM
विभागीय क्रीडा संकुलावर सुरु असलेल्या शालेय राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्राने सांघिक गटात वर्चस्व राखताना २ सुवर्ण, ३ रौप्य व एक कास्य जिंकताना पदकांचा षटकार मारला. महाराष्ट्राच्या १४ व १७ वर्षांखालील संघाने सुवर्णपदक जिंकले.
ठळक मुद्दे१४ व १७ वर्षांखालील मुलांच्या गटात गोल्डन कामगिरी : ३ रौप्य व एका कास्यपदकांचीही कमाई