काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र मिळून आ. सतीश चव्हाण यांना निवडून आणण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचून सतीश चव्हाण यांना जास्तीत जास्त पहिल्या पसंतीची मते मिळवून द्यावीत, असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी उपस्थितांना चव्हाण यांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जिजा कोरडे, काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष रामूकाका शेळके, सभापती कैलास उकिर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी अण्णा गावंडे, उदयराज पवार, बबनराव कुंडारे, नारायणराव घोडके, रफिकभाई पठाण, एकनाथराव अवचरमल, जाहेरभाई करमाडकर, शंकरराव ठोंबरे, रवी काळे, राधाकिसन भोसले, मनोज शेजूळ, सुधीर मुळे, शामबाबा गावंडे, पांडुरंग तांगडे, अंभोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिक्षक आणि पदवीधर मतदार उपस्थित होते.