औरंगाबाद : रहेमानिया कॉलनी येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात नासेर पठाण बाबू पठाण(वय २४,रा. बायजीपुरा) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला. ही घटना २ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांत तक्रार केली तर तुला मारेन अशी धमकी आरोपीने दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले.
तरूणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 8:36 PM