अजिंठा : अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू शाळेत हॉल तिकीटमध्ये बदल करून बारावीच्या परीक्षेला तोतया विद्यार्थी बसवून परीक्षा देण्यास लावणा-या रॅकेटचा मुख्य सूत्रधार शिक्षक डी. एम. मेठे (रा. जामनेर जि. जळगाव) याला अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी फर्दापूर येथे अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.शहरात नोकरी करणाºयांकडून २५ ते ५० हजार रुपये उकळून तोतया विद्यार्थ्यांमार्फत पास करून देणाºया रॅकेटचा हा मुख्य सूत्रधार फर्दापूर येथे पोलिसांना सापडला. या प्रकरणातील १५ पैकी आतापर्यंत ७ आरोपींना अटक झाली आहे. ही कारवाई अजिंठ्याचे सपोनि. किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अर्जुन चौधर,पोना. कृष्णा ढाकरे,विष्णू कोल्हे, प्रकाश कोळी आदीच्या पथकाने केली. मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्यानंतर अजिंठा पोलिसांच्या तपासाला वेग आला असून आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
अजिंठ्यातील तोतया परीक्षार्थी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:51 AM