छत्रपती संभाजीनगर: फारोळा येथील 100 एमएलडी पंपगृहातील जलवाहिनी फुटल्याने पंपगृहात व मोटारमध्ये पाणी गेल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.
शहर पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच अचानक बिघाड किंवा जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. आजही फारोळा येथील पंपगृहातील जलवाहिनी फुटली. यामुळे पंपगृह आणि त्यातील मोटारमध्ये पाणी गेले. कर्मचाऱ्यांनी लागलीच येथील वीज पुरवठा बंद केला. यामुळे पाणी उपसा ठप्प झाला आहे.
दुरुस्तीला १६ तास लागणारअचानक जलवाहिनी फुटून पंपगृहात आणि मोटारीत पाणी गेले आहे. जलवाहिनीची दुरुस्ती, मोटारमधील पाणी काढून सर्व भाग कोरडे करणे. तसेच पुन्हा पाणी उपसा सुरु करणे यासाठी तब्बल १६ तास लागणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलावे लागणार आहे.