शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

By बापू सोळुंके | Published: November 15, 2024 5:45 PM

कामगारांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाजवळ असलेल्या मद्य निर्मितीसाठी आवश्यक मका साठवलेल्या टाकीत स्फोट

छत्रपती संभाजीनगर: शेंद्रा एमआयडीसीमधील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीत मक्याची साठवणूक करुन ठेवण्यात आलेल्या टाकीचा स्फोट झाला. या घटनेत टाकीतील शेकडो टन मक्याच्या खाली अनेक कामगार दबले गेले आहेत. आतापर्यंत चार कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या जवानासह, करमाड पोलिसांनी आणि  औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मक्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

याघटनेविषयी प्राथमिक माहिती अशी की, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रॅडिको एन.व्ही.डिस्टलरीज ही मद्य निर्मिती कंपनी सन २००८ पासून कार्यरत आहे. या कंपनीत रोज ७०० ते ८०० कामगार कार्यरत असतात. या कंपनीच्या अंतर्गत असलेल्या स्टोअरेज विभाग आहे. तेथील एका टँकमध्ये ३ हजार टन क्षमतेच्या टाकीमध्ये मका साठवून ठेवण्यात आला होता. या टाकीजवळच कामगारांच्या येण्या-जाण्याचा मार्ग आहे. शु्क्रवारी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अचानक ही टाकी फुटली आणि त्यातील मक्याचा ढिगार तेथून ये-जा करणाऱ्या कामगारावर पडला. यामुळे हे कामगार मक्याच्या ढिगाराखाली दबल्या गेले. किती कामगार यात दबल्या गेले ,याची अचूक माहिती मिळू शकली नाही. 

या घटनेची माहिती मिळताच तेथे दाखल झालेल्या अग्निशामक दल, पोलिस आणि कंपनीतील कामगारांनी मदतीसाठी धाव घेतली. तेव्हा चार कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. यातील दोन कामगार बेशुद्ध होते. या चौघांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर शोध पथकाला चार कामगार मृत अवस्थेत आढळून आले आहेत. यासोबतच मक्याच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार दबले असण्याची शक्यता लक्षात घेऊन जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी पी.व्ही. सुरसे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत आणि जखमी सर्व कंत्राटी कर्मचारी किसन हिरडे ( ५० ), विजय गवळी ( ४०), दत्तात्रय बोरडे ( ४०) आणि आणखी एक अशा चार कामगारांचा मृतदेह मक्याच्या ढिगाऱ्याखाली शोध पथकाला आढळून आला. तर प्रशांत सोनवणे, प्रसाद काकड, वाल्मीक शेळके अशी जखमी कामगारांची नावे आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात