लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष एऩडी़ पवार व उपाध्यक्ष जमील अहमद यांच्याविरोधात १२ संचालकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे़ अध्यक्ष व उपाध्यक्षांनी संस्थेच्या संचालक मंडळास विश्वासात न घेता कारभार सुरु ठेवल्याचा आरोप करीत १५ पैकी १२ संचालकांनी २९ जून रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला़ त्याबाबत घेण्यात येणाऱ्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जी़ए़ औटी यांची नेमणूक केली होती़ १८ जुलै रोजी झालेल्या सभेत १५ संचालकांपैकी १२ संचालक उपस्थित होते़ अविश्वास ठरावासाठी लागणारे संख्याबळ उपस्थित असल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष एऩडी़ पवार व उपाध्यक्ष जमिल अहमद यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला़
अविश्वास ठराव बहुमताने मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:11 AM