घाटनांद्रा : नववर्षाच्या प्रारंभी येणारा व सुवासिनींचा सर्वात आवडीचा असलेला मकर संक्रांतीचा सण घाटनांद्रा परिसरात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण तीन दिवस साजरा केला जातो. त्याआधी भोगी असते. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत या सणाच्या निमित्ताने सर्व सुवासिनी मंदिरामध्ये एकत्र येऊन दान देतात. देवाला तीळ तांदूळ अर्पण करून सौभाग्याचे लेणे लुटतात.
मकर संक्रांतीच्या पावनपर्वावर गुरुवारी येथील विठ्ठल मंदिरात सर्व सुवासिनी नववारी परिधान करून रुक्मिनी मातेची ओटी भरण्यासाठी एकत्र आल्या होत्या. पहिलं वान देवाला या म्हणीप्रमाणे सुवासिनींनी सामूहिक पद्धतीने रुक्मिणी मातेची पूजा करून तिची गाजर, बिबे, ऊस, गाजर, बिबे, बोरं, उसाच्या कांड्या, ओंब्या अशा प्रकारचे वान देऊन देवीची खना-नारळाने ओटी भरली. त्यानंतर देवीच्या दरबारात सुवासिनींनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले. वाणाची देवाण-घेवाण केली तर लहान लहान कुमारिका मुलींनीदेखील एकमेकींना हळदी-कुंकू लावून आकर्षक भेटवस्तूचे वाण दिले. संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. येथील स्वाध्याय परिवाराच्या मिा जोशई यांनी उपस्थित महिलांना मकर संक्रांती सणाचे महत्त्व सांगून सर्वांनी गोड वागले पाहिजे. कोणाशी भांडण करू नये, एकमेकांबद्दल मनात वितुष्ट ठेवू नका, असे आवाहन केले.
-------------
फोटो : घाटनांद्रा : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या निमित्ताने सुवासिनी महिला एकत्र आल्या होत्या.
(छायाचित्र दत्ता जोशी) हा फोटो लावणे