शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
8
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
9
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
10
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

देशभरातून कुठूनही व्हॉट्सॲप, ई-मेलद्वारे करा पोलिसांकडे ई-तक्रार ! अशी आहे पद्धत...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 8:01 PM

ई-तक्रार तक्रारीची दखल घेणे पोलिसांना बंधनकारक आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदींमुळे पोलिस विभागाच्या कार्यशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाले. दैनंदिन गुन्ह्याशी संबंधित प्रक्रियेसह प्रशासकीय कामकाजात या नव्या कायद्यांमुळे बदल झाले. आता नागरिकांना देशभरातून कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे. त्या तक्रारीची दखल घेणे पोलिसांना बंधनकारक आहे. मात्र, ई-तक्रारीच्या तीन दिवसांमध्ये पीडित व्यक्तीने ठाण्यात जाऊन एफआयआरची प्रक्रिया पार पाडणे देखील आवश्यक आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल.

१ जुलैपासून अंमलबजावणीइंग्रजकालीन आयपीसी म्हणजेच ‘इंडियन पिनल कोड’चा वापर २०२४ मध्ये थांबवण्यात आला. १ जुलैपासून देशात ‘भारतीय न्याय संहिते’ला प्रारंभ झाला. यात कायद्यातील बदलांसह अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत त्याला अधिकृत दर्जा देखील दिला आहे. छायाचित्रण, सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्र, रेकॉर्ड केलेले संभाषण, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आदी तांत्रिक बाबी कायदेशीररीत्या गृहित धरल्या जात आहेत. त्यामुळे व्हॉट्सॲप, ई-मेलद्वारे होणारी तक्रार देखील गृहीत धरली जाते.

येथे करा तक्रारशहर पोलिसांच्या संकेतस्थळानुसार 8390022222 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याशिवाय https://aurangabadcitypolice.gov.in/ या संकेतस्थळावर शहराच्या १८ पोलिस ठाण्यांचे स्वतंत्र ई-मेलआयडी, प्रभारींचे संपर्क क्रमांक आहेत. त्यावर देखील तक्रार करु शकता.

ई-तक्रारची दखल घेतली जातेपोलिस महासंचालक कार्यालयाने मुख्य पोलिस घटकासह त्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक पोलिस ठाण्याला स्वतंत्र ई-मेल आयडी दिले आहे. संकेतस्थळावर ते उपलब्ध आहे. नागरिक त्यावर तक्रार करु शकतात. त्याची निश्चित दखल घेतली जाते. एफआयआरसाठी तीन दिवसांत तक्रारदाराला ठाण्यात यावे लागते.- डॉ. रणजित पाटील, सहायक पोलिस आयुक्त, उस्मानपुरा विभाग.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी