छत्रपती संभाजीनगर : ४० ते ५० रुपये देऊन डझनभर पिवळीधमक, टवटवीत केळी खरेदी केली आणि आतून काळी निघाली... असेही तुमच्या बाबतीत घडले आहे का? मग जरा थांबा. कारण, पावडरने पिकविलेली केळी तुम्ही खात तर नाही ना, याची खात्री करून घ्या... उपवासामुळे केळींना मोठी मागणी आहे. त्यामुळे कुत्रिमरीत्या केळी पिकविली जात आहेत.
केळी ५० रुपये डझनऔरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी केळीच्या बागा आहेत. याशिवाय जळगावहून मोठ्या प्रमाणात केळी येत आहेत. श्रावणामुळे उपवास करणाऱ्यांकडून केळीला मोठी मागणी वाढली आहे. यामुळे ३० ते ४० रुपये डझन विक्री होणारी केळी ५० रुपयांनी विकत आहे.
बाहेरून टवटवीत, आतून काळीहातगाडीवर केळींची मोठ्या प्रमाणात विक्री होते. दुरून या केळी पिवळ्याधमक दिसतात. केळी खरेदी केल्यावर सहसा कोणी तिथे खात नाही. घरी मात्र ती केळी आतून काळी झालेली दिसते. विक्रेत्याने आपल्याला फसविले, हे त्यावेळी ग्राहकांच्या लक्षात येते.
घशाला त्रासदायकरात्रीतून श्रीमंत होण्याच्या नादात आता कृत्रिमरीत्या केळी पिकविली जात आहे. यात विविध रसायनांचा वापर केला जातो. अशा केळी खाल्ल्याने घशाला त्रास होतो, सर्दी होते.
कारवाई करणारकेळी पिकविण्यासाठी इथिलिनचा काही प्रमाणात वापर करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, योग्य पद्धतीने हे पिकविले पाहिजे. इथिलिनचा वापरही योग्य प्रमाणात करायचा आहे. तो होतो की नाही, किंवा पिकविण्यासाठी हानिकारक अन्य द्रव्य वापरल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आपणच घ्यायची काळजीकेळी खराब निघत असेल तर ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. केळी खरेदी करतानाच विक्रेत्यांना केळीचे साल काढून ती आतून कशी आहे, हे दाखविण्यास सांगावे. विक्रेत्याने मनाई केल्यास अशा केळी खरेदी करू नये.
महिनाभरात कारवाई नाहीकेळी पिकविण्यास इथिलिनचा वापर करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. यामुळे केळी कृत्रिमरीत्या पिकविली जात आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडे एवढे अधिकारी व अन्न निरीक्षक नाही की ते प्रत्येक गोदामात किंवा हातगाडीवर जाऊन केळी तपासतील. यामुळे मागील महिनाभरात एकाही गोदाम किंवा हातगाडीवरील केळी. तपासणी करण्यात आली नाही.