औरंगाबाद : औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त व आंतरराष्ट्रीय पंच मकरंद जोशी यांची एशियन जिम्नॅस्टिक्स युनियनच्या एरोबिक्स जिम्नॅस्टिक या प्रकारातील तांत्रिक समितीत निवड झाली आहे.डिसेंबर महिन्यात दोहा येथे झालेल्या एशियन जिम्नॅस्टिक्स युनियनच्या बैठकीत गुणवत्ताधारक जिम्नॅस्टिकमधील विविध देशांच्या तांत्रिक सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे तांत्रिक समितीवर गुणवत्ता या निकषाच्या आधारावर मकरंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे. मकरंद जोशी हे २00१ पासून एरोबिक जिम्नॅस्टिक्सचे आंतरराष्ट्रीय पंच असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाचा कोचिंग लेव्हल २ हा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. त्यांनी आतापर्यंत ४ जागतिक एरोबिक्स जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धा, दोन इनडोअर एशियन गेम्स, २ आशियाई स्पर्धा व एका जागतिक स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी केली आहे. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही त्यांनी भारतीय जिम्नॅस्टिक संघाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. ते २0१५ पासून भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाचे कार्यकारिणी सदस्य असून महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव आहेत. या निवडीबद्दल भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी, उपाध्यक्ष कौशिक बिडीवाला, सचिव रणजित वसावा, महाराष्ट्र हौशी संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष उत्तम लटपटे, माधुरी वैद्य, साईचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, अजितसिंग राठोड, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, प्रशिक्षक रामकृष्ण लोखंडे, तनुजा गाढवे, जिल्हा संघटनेचे संकर्षण जोशी, सागर कुलकर्णी, विशाल देशपांडे, आदित्य जोशी, रणजित पवार, रोहित रोंघे, राहुल तांदळे, वृषाली नागेश, दीपाली बजाज, प्रवीण शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मकरंद जोशी तांत्रिक समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:15 AM