शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मलकापूर बँकेच्या ठेवीदारांचा संयम सुटला; अध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक, मॅनेजरलाही चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 8:25 PM

मलकापूर बँक ठेवीदार कृती समितीने सिडको एन-३ येथील केशरबाग मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.

छत्रपती संभाजीनगर : रिझर्व्ह बँकेने मलकापूर अर्बन को-ऑप. बँकेचा परवाना रद्द केला. यामुळे ४०० वर ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. सोमवारी आयोजित बैठकीत बँकेचे अध्यक्ष व माजी आ. चैनसुख संचेती हे आले असताना त्यांना ठेवीदारांच्या संतापाला सामोरे जावे लागले. त्यांनी बैठकीतून काढता पाय घेताच काही संतप्त युवकांनी त्यांच्या कारचा पाठलाग करीत दगडफेक केली. व्यवस्थापकाच्या श्रीमुखात भडकावली.

मलकापूर बँक ठेवीदार कृती समितीने सिडको एन-३ येथील केशरबाग मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बँकेचे अध्यक्ष चेैनसुख संचेती हेही आले. ‘बँकेला ४७ कोटी ९१ लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. आम्ही आरबीआयच्या विरोधात सक्षम प्राधिकरणाकडे अपील दाखल केले आहे. येत्या दि. २६ सप्टेंबरला नवी दिल्लीत सुनावणी आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल व बँकेला पुन्हा परवानगी मिळेल’, असे संचेती सांगत असताना ‘राजकीय भाषा बोलू नका, पैसे परत कधी देणार हे १०० रुपयांच्या बाँड पेपरवर लिहून द्या’, अशी भूमिका काही ठेवीदारांनी घेतली. वातावरण तापलेले पाहून पोलिस, सुरक्षा रक्षकाच्या फौजफाट्यात संचेती यांनी काढता पाय घेतला. बैठकीचे आयोजन कृती समितीचे शिवनाथ राठी यांनी केले होते. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय संचेतीही हजर होते.

मार्च २०२४ मध्ये व्याजासह ठेवीदारांची रक्कम मिळेलचैनसुख संचेती यांनी सांगितले की, आजघडीला बँकेकडे ६६९ कोटी ५९ लाख रुपयांच्या ठेवी असून, त्यात १२० पतसंस्थांच्या २१७ कोटींच्या ठेवी आहेत. उर्वरित ४५२ कोटी ५९ लाखांच्या ठेवी सामान्य ठेवीदारांच्या आहेत. आम्ही ठेवीदारांची रक्कम सहज देऊ शकतो. यासाठी आरबीआयची परवानगी मिळाली की, बँक मार्च २०२४ पर्यंत सर्व ठेवीदारांची रक्कम व्याजासह देईल.

टॅग्स :bankबँकCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद