लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पाथरी तालुक्यातील मसला तांडा येथे पोलिसांनी हातभट्टी दारु बनविण्यासाठी वापरले जाणाºया गुळ मिश्रीत रसायनासह ४०० लीटर हातभट्टी दारु नष्ट केली़१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वषेण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली़ पाथरी तालुक्यातील मसला तांडा शिवारात हातभट्टी दारू तयार केली जात होती़ या ठिकाणी सापळा लावून दारुचे रसायन व हातभट्टी दारू एका खदानीमध्ये नष्ट करण्यात आली. सुमारे १० हजार रुपयांची ही हातभट्टी दारू होती़ पाथरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे़
हातभट्टी दारुचे सडके रसायन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 12:33 AM