कन्नड (छ्त्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील भांबरवाडी शिवारात मंगळवार रोजी ऋषिकेश राठोड, याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तेव्हा पासून या बिबट्याच्या शोधात सर्व वनपरिक्षेत्र विभाग होता. त्यांच्या प्रयत्नाला दिनांक ३० जून रोजी पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान यश आले. हा नरभक्षी बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे.
दि.२८ जून शुक्रवारी रात्री बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेतकरी बसराज राठोड यांच्या उपळा येथील गट नंबर ३० मध्ये त्यांच्या शेळीचा पडश्या पाडला होता. त्याच ठिकाणी वन विभागाने पाला पाचोळा, चारा, गवत लाऊन (झोपडी वजा) पिंजरा लाऊन त्यात हल्ला केलेल्या शेळीचं उरलेलं मास टाकून हा ट्रॅप लावला. मासाच्या लालसेने बिबट्या पिंजऱ्यात आला अन सापळ्यात अडकून जेरबंद झाला.
रात्र न दिवस बिबट्या वर नजर ठेवून केलेल्या या कारवाईत वन विभागाला यश आल्याने भांबरवाडी येथील ग्रामस्थांनी वन विभागाचे कौतुक करून आभार मानले.यासाठी एस. एन. मंकावार उप वनसंरक्षण अधिकारी छत्रपती संभाजीनगर , दादा तौर सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून वरिष्ठाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहिणी साळुंके यांनी सांगित.
बिबट्याला पकडण्यासाठी रोहिणी साळुंके वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड वनपाल आर .डी .पठाण, एस. पी .कादी , एस. एन .नागरे टी .झेड. खरातवनरक्षक आर. बी. जाधव, एस.एन. नागरगोजे यशोदा साळवे , सोनार यांच्या सह कन्नड, वैजापूर, नागद येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.