शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महावितरणपुढे मनपाने टेकले हात

By admin | Published: June 13, 2014 1:10 AM

औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे.

औरंगाबाद : महावितरण कंपनीसमोर महापालिकेने अक्षरश: हात टेकले आहेत. २२ मेपासून विजेच्या लपंडावाने शहराच्या पाणीपुरवठ्याचे वाटोळे केले आहे. १२ जून रोजी सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी फारोळा पंपगृह येथील ३३ के.व्ही. सबस्टेशनमधील २ हजार के.व्ही.ए. ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. दुपारी १ वाजून १० मिनिटांपर्यंत १,४०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी त्यामुळे बंद होती. शहराला पाणीपुरवठाही त्यातून सुरू असतानाच ती जलवाहिनी बंद पडल्यामुळे उद्या १३ जून रोजी अनेक भागांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे, तर काही भागांना पाणीपुरवठा होईल, मात्र उशिरा. असे मनपा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून ती पूर्ण करता-करता पालिका पाणीपुरवठा विभागाच्या नाकीनऊ आले आहेत. अधिकारी- नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी होण्यापर्यंत वेळ आली आहे, तर नागरिक पालिका आणि महावितरणवर ताशेरे ओढत आहेत. दोन्ही संस्थांमध्ये बैठका झाल्या, आॅन दी स्पॉट पाहणी झाली. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने १५ लाख देण्याचेही ठरले. ते कामही सुरू झाले आहे; पण सध्या असलेल्या यंत्रणेमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होतो आहे.दरम्यान, जनतेच्या हितासाठी महापालिकेच्या पदाधिकारी किंवा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचा जोे दबाव महावितरणवर असायला हवा तो नसल्यामुळे महावितरण मनमानी पद्धतीने वागत असल्याची प्रतिक्रिया महापालिका वर्तुळात उमटत आहे. माध्यमांमधून पाणीटंचाईचा विषय पुढे आणल्यानंतरच महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांना जाग आल्याचे चित्र आहे. आठ दिवसांची मुदत आज संपणार महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि मुख्य अभियंता शंकर शिंदे व पथकाने ५ रोजी फारोळा, ढोरकीन येथील महावितरणच्या उपकेंद्रांची पाहणी केली होती. ढोरकीनच्या एक्स्प्रेस फिडर लाईनला १५ लाख रुपये मनपाते तातडीने दिले. त्या कामाला अंदाजे ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. १४ जून रोजी ती मुदत संपत आहे. फिडर लाईनचे काम झाल्यानंतर भविष्यात वीजपुरवठा खंडित होऊन त्रास होणार नाही. आठ दिवसांत ते काम पालिका जातीने लक्ष घालून करून घेणार होती. कशामुळे झाली अडचणपाणीपुरवठ्याच्या जायकवाडीतील योजनांना ज्या सबस्टेशवरून वीजपुरवठा होतो तेथून जालना पाणीपुरवठा योजना व काही उद्योगांना कनेक्शन दिले आहे. महावितरणने आहे त्याच नेटवर्कमधून कनेक्शन दिल्यामुळे औरंगाबाद पाणीपुरवठ्याला उच्च दाबाने वीज मिळत नाही. परिणामी, २० दिवसांपासून सिडको-हडकोसह शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागते आहे.