प्रमुख पाहुणे म्हणून मलिक अंबर यांचे थेट १६ वे वंशज ॲड. ए. आर. अंबरी हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. राजकुमार घोगरे उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बोरुडे, मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रा. दिनेश पाटील व देवदत्त कदम, असिम देऊस्कर, अनुज देशपांडे, दत्ता लांडगे, पल्लवी लोमटे, भाऊराव बेंडे, मयूर गोठुकडे, जात्यांतक शेतकरी शेतमजूर सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयराम सांगळे, गजानन रताळे, भगवानराव शिंदे, राम अंभुरे, ह.भ.प. शंकर महाराज राऊत, ह.भ.प. ताई महाराज मंगळवेढेकर, प्रसाद काळे, नूरजहाँ शेख, कृष्णा देशमुख, मुकेश निकम, इस्माईल तांबोळी, शरद बोरसे, शिवहार इंगळे आदींची उपस्थिती होती. ॲड. अंबरी यांनी शेतकऱ्यांसाठी जलव्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप मानवमुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांनी केला. या कार्यक्रमाचे नियोजन अद्वैत देशमुख यांनी केले होते.