बीड: सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणेशोत्सवात प्रसाद वाटप करण्यात येतो़ अन्न औषध प्रशासनाने मंडळांच्या प्रसादालाही परवाना बंधनकारक केला आहे़ जिल्ह्यात याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी कामाला लागले आहेत़अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यावसायिकांसाठी परवाना व नोंदणी नियमन २०११) अन्वये सर्व अन्न व्यावसायिकांना परवाना व नोंदणी अनिवार्य आहे़ त्यातील पोट कलमानुसार धार्मिक ठिकाणातील अन्नविषयक सेवांचा समावेश होत असल्याने नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी सागर तेरकर यांनी सांगितले़प्रसाद तयार करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे़ त्यासाठी मंडळांना अन्न औषध प्रशासनाकडून रितसर परवाना घ्यावा लागणार आहे़ प्रसादामध्ये खवा, मावा यांचा वापर होत असल्यास अधिक दक्षता घेणे महत्ताचे आहे, असे तेरकर म्हणाले़ दूध व दुग्धजन्य पदार्थ थंड राहतील, याची काळजी घ्यावी़ जुना, शिळा व अनेक दिवसांपासून साठवलेला प्रसाद वापरू नये़ प्रसाद बनविणाऱ्या मंडळांनी कच्च्या मालाचे खरेदी बील, केटरर्स, स्वयंसेवक यांची संपूर्ण माहिती, प्रसाद वितरीत करणाऱ्या स्वयंसेवकांची माहिती नोंद करुन ठेवावी़ तपासणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी केव्हाही येऊ शकतात़ त्यामुळे तपासणीत काही अनुचित प्रकार आढळणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले़परवाना न घेता प्रसाद तयार केल्याचे आढळल्यास संबंधित मंडळावर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्याअंतर्गत २०११ मधील तरतुदींच्या उल्लंघन प्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी त्यांनी दिली़(प्रतिनिधी)सार्वजनिक उत्सवांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमावली घालून दिली आहे़४त्यानुसार प्रसादासाठी लागणारा कच्चा माल नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावा़४प्रसादासाठी लागणारी भांडी आरोग्यदायी व झाकण असलेली असावीत़४फळांचा प्रसाद म्हणून वापर करताना खरेदी क्षेत्रातील ओळखीच्या, परवाना नोंदणी धारकाकडूनच करावी़४पाणी स्वच्छ वापरावे़४प्रसाद बनविणाऱ्या संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा़
प्रसादासाठी मंडळांना परवाना बंधनकारक !
By admin | Published: August 27, 2014 1:31 AM