पाटोदा (माव) : परतूर तालुक्यातील पाटोदा (माव) येथे सलग दुसऱ्या दिवशीही महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, आष्टी पोलिसांनी गावात पोलिस बंदोबस्त लावला आहे.रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास पाटोदा शिवारात भागित्राबाई सुधाकर वखरे यांच्या गळ्यातील ७ ग्रॅमची सोन्याची पोत चोरट्यांनी हिसकावून नेली होती. चोवीस तासाच्या आत सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास पुन्हा अशीच घटना घडली. तारामती प्रभाकर येवले यांच्या गळ्यातील ५ ग्रॅमचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. या दोन्ही घटनांप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पाटोद्यात दुसऱ्या दिवशीही मंगळसूत्र लांबविले
By admin | Published: February 17, 2015 12:07 AM