शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मांगीरबाबा यात्रेत १०० वर्षांच्या गळ टोचणीच्या परंपरेला तिलांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 6:07 PM

मांगीरबाबा देवस्थान समिती व पोलिसांनी केली जनजागृती

ठळक मुद्देमतदानामुळे भाविकांची संख्या ४० टक्क्यांनी घटली

- श्रीकांत पोफळे 

शेंद्रा (औरंगाबाद ) : मांगीरबाबा देवस्थान समिती व पोलिसांनी केलेली जनजागृती तसेच मंगळवारी भाविकांना गळ न टोचण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभर वर्षांच्या परंपरेला भाविकांनी पहिल्या दिवशी तिलांजली दिल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे लोकसभेचे मतदान व यात्रा एकाच दिवशी आल्याने भाविकांच्या संख्येत ४० टक्के घट झाल्याची माहिती देवस्थान समितीने दिली. 

मांगीरबाबाच्या दर्शनाला राज्यासह परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. शेंद्रा येथे मंगळवारी सकाळी जवळपास एक लाख भाविक दाखल झाले होते. ‘मांगीरबाबा की जय’च्या घोषणेने शेंद्रा परिसर दणाणून गेला होता.पहाटेपासून नवस फेडणारे भाविक अनवाणी मंदिराकडे जात होते. नवस केलेल्या महिला व पुरुषांना चारही बाजूला कापड धरून दर्शनाला नेण्यात येत होते. बाबांच्या मंदिरासमोर मंडप टाकल्यामुळे भाविकांसाठी मुबलक सावली होती. रेवड्यांची उधळण करीत बाबांच्या जयघोषाने मंदिर परिसरात अत्यंत उत्साहाचे वातावरण होते. 

यंदा मतदानाचा व यात्रेचा एकच दिवस आल्याने भाविकांची संख्या ४० टक्क्यांनी घटल्याचा प्राथमिक अंदाज देवस्थान समितीने व्यक्त केला आहे; परंतु उद्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे उद्या भाविक गळ टोचणीस फाटा देतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मंदिराच्या शेजारी देवस्थान समितीचे कार्यालय असून, समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ भाविकांना मार्गदर्शन करीत होते.

मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेतली जात होती. यासाठी सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, सदस्य रेखा तांबे, नूरजहाँ पठाण, रवींद्र्र तांबे, दिलीप कचकुरे, अप्पासाहेब कचकुरे, सुखदेव नवगिरे हे विशेष परिश्रम घेत होते. याठिकाणी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाल यांच्यासह ११ पोलीस अधिकारी व १०० कर्मचारी बंदोबस्तावर होते. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस