लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुटुंब, मुले, समाज अशा सर्वांच्याच जबाबदारीचे ओझे उचलून जेव्हा एक महिला स्वत:च्या अस्तित्वासाठी लढते, स्वत:ची ओळख निर्माण करते, तेव्हा ती नक्कीच एक यशस्विनी होते. तिच्या अथक परिश्रमांना दिलेली मनमुराद दाद म्हणून आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकींनी सक्षम व्हावे म्हणून, ध्येयवेड्या सेवाव्रतींचा सन्मान सोहळा ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजित करण्यात आला होता.गुरुवारी सायंकाळी श्रीहरी पॅव्हेलियन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाºया कर्तबगार महिलांना ‘सखी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यासोबतच सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या सदाबहार गीतांचा नजराणा सखींमध्ये एक नवे चैतन्य निर्माण करून गेला.विभागीय उपायुक्त विजयकुमार फड, उपायुक्त (महसूल) वर्षा ठाकूर, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, भाग्यविजय वास्तू सोल्युशन्सचे डॉ. विजय चाटोरीकर, वृषाली चाटोरीकर, अभिनव इंटरनॅशनल स्कूलचे डॉ. विजय वाडकर, मानसी वाडकर, फोनिक्स फॅशन डिझायनिंगच्या प्रीती सोनवणे आदींची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.औरंगाबाद जिल्हा आणि मराठवाडा विभागातून हे पुरस्कार देण्यात आले. शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा, सामाजिक, वैद्यकीय, शौर्य, अशा सात विभागांमध्ये उत्तम कामगिरी करणाºया महिलांना गौरविण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार अंबिका टाकळकर यांना मिळाला. यासाठीप्रा. वृंदा देशपांडे, अश्विनी लखमले यांना नामांकने देण्यात आली होती. कवयित्री प्रिया धारूरकर या साहित्य-सांस्कृतिक या क्षेत्रांतील पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. यासाठी सौख्यदा देशपांडे, केतकी पखाले यांना नामांकने दिलेली होती. शीतल तुपे यांनी औद्योगिक क्षेत्रातला पुरस्कार मिळाला. यासाठी हर्षा इंगळे, प्रतिभा सानप यांना नामांकन होते.बास्केटबॉल खेळाडू खुशी डोंगरे यांना क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार मिळाला. यासाठी हर्षदा निटावे, श्वेता देवडे यांचीही निवड करण्यात आली होती. सरला कामे, प्रिया विप्र यांना सामाजिक विभागासाठी नामांकने होती. रेणुका कड या क्षेत्रातील पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. डॉ. ज्योत्स्ना क्षीरसागर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पुरस्कार पटकाविला. यासाठी डॉ. शिल्पा तोतला व डॉ. अमरजा नागरे यांना नामांकन मिळाले होते. सविता शेवारे या शौर्य क्षेत्रातील पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.डॉ. दुलारी कुरेशी यांना जीवनगौरवकला, इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रांत डॉ. दुलारी कुरेशी यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. औरंगाबादच्या ऐतिहासिक दरवाजांवर त्यांनी अनेक लेखमाला लिहिल्या असून, त्या देशभर चर्चिल्या गेल्या. शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रचार-प्रसारासाठी व पर्यटन विकासासाठी डॉ. कुरेशी यांनी डॉ. मोरवंचीकर यांच्या सहकार्याने एलोरा-औरंगाबाद महोत्सवाची सुरुवात केली. त्यांनी ऐतिहासिक वारशाांवर लिहिलेली अनेक पुस्तके आज संदर्भ ग्रंथ म्हणून वापरली जातात. या कार्याचा सन्मान म्हणून गायिका वैशाली सामंत यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.मराठवाडा विभागातील ‘सखी सन्मान’ पुरस्काराच्या मानकरी१. शैक्षणिक- सुक्षम हमणे (हिंगोली)२. साहित्य व सांस्कृतिक- प्रिया धारूरकर (औरंगाबाद)३. उद्योग- व्यवसाय- छाया काक डे (लातूर)४. खेळ- खुशी डोंगरे (औरंगाबाद)५. वैद्यकीय- डॉ. शोभा मोजेस (जालना)६. शौर्य- दीपाली गिते (बीड)७. सामाजिक- रेणुका कड (औरंगाबाद)
औरंगाबादेत ध्येयवेड्या सेवाव्रतींना मानाचा मुजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:18 AM
कुटुंब, मुले, समाज अशा सर्वांच्याच जबाबदारीचे ओझे उचलून जेव्हा एक महिला स्वत:च्या अस्तित्वासाठी लढते, स्वत:ची ओळख निर्माण करते, तेव्हा ती नक्कीच एक यशस्विनी होते. तिच्या अथक परिश्रमांना दिलेली मनमुराद दाद म्हणून आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन अनेकींनी सक्षम व्हावे म्हणून, ध्येयवेड्या सेवाव्रतींचा सन्मान सोहळा ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्देसखी मंच : सखी सन्मान पुरस्कार सोहळा; सखींना महिला दिनाची अनोखी भेट