औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) आणि स्पेशल इकॉनॉमी झोनमुळे (एसईझेड) औरंगाबादेत अनेक उद्योग येणार आहेत. उद्योगांमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत, वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी, असे मत बागला उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांनी व्यक्त केले.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मटेरियल मॅनेजमेंटच्या (आयआयएमएम) औरंगाबाद शाखेतर्फे सोमवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयआयएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष लालभाई पटेल, उपाध्यक्ष (पश्चिम) जी.एस. पालकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी.पी. रेड्डी, शाखा अध्यक्ष जितेश गुप्ता, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र जोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पी.पी. रेड्डी, तांत्रिक समिती सदस्य प्रमुख जे.एस. संघई उपस्थित होते.उद्योगांमध्ये पर्चेस अँड सप्लाय मॅनेजमेंटमधील काम महत्त्वाचे असून, उद्योगांचा डोलारा त्यावर अवलंबून असतो. कच्च्या मालापासून सर्वोत्कृष्ट उत्पादन ही एक मोठी कसब असते. उत्पादन करताना वेस्टेज कमीत कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. मोठ्या उद्योगांसाठी व्हेंडर हा एक महत्त्वाचा घटक असून, त्याला प्रतिष्ठा देणे गरजेचे असते. चांगल्या संबंधांमुळे ही मंडळी संकटातही आपल्या बाजूने उभे राहतात, असा माझा अनुभव आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करताना दर्जा, किंमत आणि कार्यक्षमता, वक्तशीरपणा या गोष्टीही कमालीच्या उपयोगी पडतात.लालभाई पटेल यांनी यावेळी नमूद केले की, भविष्यकालीन संधी आणि धोके आताच ओळखून अनेक नवीन अभ्यासक्रम आम्ही सुरू करीत आहोत. प्रास्ताविक शाखा अध्यक्ष जितेश गुप्ता यांनी केले. त्यांनी शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पी.पी. रेड्डी यांनी कार्यशाळा आयोजनामागची भूमिका विषद केली. यावेळी माजी अध्यक्ष पिंपळकर, जऊळकर, आनंद केंभवी आदींसह उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात पटेल यांच्या हस्ते रेड्डी, गुप्ता, आर. डी. जऊळकर, सुधीर पाटील, के. श्रीहरी, सुशांत पठारे यांना गौरविण्यात आले. संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
डीएमआयसी, एसईझेडमुळे अनेक उद्योग येणार
By admin | Published: September 30, 2014 1:10 AM