शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

जिल्ह्यातील अनेक कामांचे इन्स्पेक्शन रजिस्टर गायब

By admin | Published: September 07, 2016 12:16 AM

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केलेल्या कामांचे तपासणी (इन्स्पेक्शन) रजिस्टर गायब झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केलेल्या कामांचे तपासणी (इन्स्पेक्शन) रजिस्टर गायब झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. दीड वर्षांपासून कोट्यवधी रुपयांची कामे केलेल्या मेजरबुकचा तपास लागत नसून त्यामध्ये आता इन्स्पेक्शन रजिस्टरची भर पडल्याने विभागाचा सगळा कारभार आलबेल असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिल्लोड तालुक्यातील खचलेल्या पुलाचा इन्स्पेक्शन रजिस्टरचा कसून शोध सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक बांधकामांचे इन्स्पेक्शन रामभरोसे असल्याचे यातून दिसते आहे. विभागात दीड वर्षांपासून १६ हजार ६४८ मेजरबुक (काम मोजमाप पुस्तिका) गहाळ आहेत. एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामाच्या नोंदी जरी गृहीत धरल्या तरी कोट्यवधी रुपयांच्या कामांत घोटाळा झाल्याची शक्यता आहे. मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल अदा केले गेले आहे, याचा लेखाजोखा लेखा विभागाला आजपर्यंत सांगता येत नाही. कन्नड रोडवरील सिल्लोड तालुक्यातील मोढा खु.वाडी शिवारातील गट नं. २४२, २४३ हद्दीतील पखाना नाल्यावरील दगडी पूल सोमवारी खचला. कन्नड ते भराडी या राज्य मार्गावर तो पूल आहे. यात चार जण जखमी झाले. या पुलाची तांत्रिक माहिती देण्यासाठी बांधकाम विभागाचा कुठलाही अधिकारी, अभियंता सोमवारी पुढे आला नाही. अशीच परिस्थिती मंगळवारी देखील होती. त्या पुलाच्या रेकॉर्डची जुळवाजुळव करण्यात सगळा विभाग कामाला लागला होता. त्या पुलाची कुठलीही तांत्रिक माहिती विभागाने घटना घडल्यानंतर एक दिवस उलटला तरी समोर आणली नाही. दरम्यान, सिल्लोडच्या घटनेप्रकरणी कार्यकारी अभियंता वृषाली गाडेकर यांच्याशी फोनवर संपर्क केला असता, त्या म्हणाल्या, पुलाची तांत्रिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही कामाचे टेंडर काढल्यानंतर जेव्हा काम सुरू होते, तेव्हा त्या कामाच्या निर्धारित कालावधीतील नोंद मेजरबुकमध्ये ठेवली जाते. कामाचे मोजमाप आणि टेंडरमधील तरतुदी याची माहिती त्यामध्ये असते. मेजरबुकच्या नोंदीनंतरच सी. सी. तयार होऊन ती लेखा विभागाकडे जाते व त्यानंतर संबंधित कंत्राटदाराला बिल अदा केले जाते. तर रजिस्टरमध्ये कामाच्या इन्स्पेक्शनची माहिती नोंदविली जाते.