छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात हवामान खात्याने जूनपासून ४५ वेळा अलर्ट दिले. प्रत्यक्षात त्या दिवशी किंवा त्या काळात फारसा पाऊस झाला नाही. हवामान खात्याचा अंदाज फिप्टी-फिप्टी ठरला. पावसाळा सुरू होऊन आजवर ८६ दिवस झाले आहेत. २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’चा अंदाज हवामान खात्याने दिला हाेता. परंतु त्या दिवशी पाऊस झाला नाही.
अंदाजाच्या तुलनेत किती बरसला?जून २०२४ : १३ वेळेस पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले१ जून प्रत्यक्षात.....०० मिमी पाऊस७ जून प्रत्यक्षात ....३.८ मिमी पाऊस१५ जून प्रत्यक्षात .....११.१ मिमी पाऊस२२ जून प्रत्यक्षात .....१.१ मिमी पाऊस३० जून प्रत्यक्षात.....०.१ मिमी पाऊस
जुलै : १५ वेळेस पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले.१ जुलै प्रत्यक्षात.....१३.७ मिमी पाऊस७ जुलै प्रत्यक्षात ....२.३ मिमी पाऊस१५ जुलै प्रत्यक्षात .....३१.८ मिमी पाऊस२२ जुलै प्रत्यक्षात .....६.७ मिमी पाऊस३० जुलै प्रत्यक्षात.....३.८ मिमी पाऊस
ऑगस्ट : १७ वेळा पावसाचे अंदाज वर्तविण्यात आले.१ ऑगस्ट प्रत्यक्षात.....४.२ मिमी पाऊस७ ऑगस्ट प्रत्यक्षात ....०.१ मिमी पाऊस१५ ऑगस्ट प्रत्यक्षात .....०० मिमी पाऊस२२ ऑगस्ट प्रत्यक्षात .....२.० मिमी पाऊस२५ ऑगस्ट प्रत्यक्षात.....३३.२ मिमी पाऊस
केवळ ५० टक्के अंदाज ठरले खरेहवामान खात्याने पावसाच्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजापैकी केवळ ५० टक्के अंदाज खरे ठरले.
आतापर्यंत ९४ टक्के पाऊसजिल्ह्यात आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ९४.९ इतके टक्के पाऊस झाला आहे. ५८१ मिमी वार्षिक सरासरी असून, ४०१ मिमी पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने घेतली आहे.
अलर्टला शास्त्रीय आधार असावा....हवामान खात्याने दिलेल्या अलर्टला तंतोतंत शास्त्रीय आधार असावा. यासाठी एक्स बँड रडार असणे गरजेचे आहे. हवामान खात्याचे काम सुधारण्यासाठी ११ एक्स बँड रडार बसविणे गरजेचे आहे. यंदा ओल्या दुष्काळाच्या सावटाची शक्यता आहे.-प्रा. किरण जोहरे, हवामान अभ्यासक