शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 3:38 PM

गर्दीत विनामास्क बिनधास्त वावर, हे वागणे कोरोना वाढीला हातभार लावण्याची भीती

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तलावर टांगलेली असूनही मास्कचा वापर प्रचंड कमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी मास्क तोंडावरून हनुवटीवर, मानेखाली आला होता (Many reasons not to use a mask). आता तर मास्क खिशात अथवा घरीच ठेवून नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरत आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये मास्क नसल्यावरून काहींना हटकल्यावर ‘सारखं थुंकावं लागतं’, ‘मेकअप केलेला आहे’, ‘खिशातच आहे ना मास्क’ अशी उत्तरे मिळाली.

शहरात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. सोशल डिस्टन्सिंगलाही फाटा दिला जात आहे. हे वागणे कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढीला हातभार लावू शकते. संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर कराच, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

मास्क ना रस्त्यावर, ना बाजारातक्रांती चौकक्रांती चौकातील वाहतूक सिग्नलवर १० वाहनचालकांपैकी ७ वाहनचालक विनामास्क, तर दोघांचा मास्क हनुवटीला होता. चौकात रिक्षाच्या प्रतीक्षेत थांबलेले अनेक जण विनामास्क होते. गप्पा मारत बसलेले युवकही विनामास्क होते.

पैठण गेटरस्त्याने ये-जा करणाऱ्यांंमध्ये विनामास्क असलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. या रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक दुचाकीधारकही विनामास्क पाहायला मिळाले. गर्दीचा परिसर असताना विनामास्क फिरताना नागरिकांना कोणतीही चिंता वाटत नव्हती.

गुलमंडीजणू कोरोना संपला, अशीच स्थिती पाहायला मिळाली. एखाद्या दुकानात विनामास्क प्रवेश करताना ग्राहकांना कोणीही अडवत नव्हते. ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे, तेही फक्त बघ्याची भूमिका घेत होते.

मास्क न वापरण्याची ही काय कारणे झाली?मास्क घरी राहिलामी रोज मास्क वापरतो. परंतु आज गडबडीत घरीच राहिला. मास्कअभावी दंड होतो, हे मला माहीत आहे. पण लगेच रुमाल बांधतो.- एक तरुण, क्रांती चौक

तंबाखू खाल्ला म्हणून...थोड्या वेळापूर्वीच तंबाखू खाल्ला. थुंकण्यासाठी मास्क काढून खिशात ठेवला. नेहमीच मास्क वापरतो.- एक ज्येष्ठ, गुलमंडी

मास्कला लिपस्टिक लागतेखरेदीसाठी जायचे म्हणून मेकअप केला. मास्कला लिपस्टिक लागू नये, म्हणून मास्क घातला नाही. पण जवळ मास्क आहे.- एक तरुणी, पैठण गेट

मास्क नसेल तर ५०० रुपये दंडमास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून नागरी मित्र पथकामार्फत या आठवड्यात २८ हजारांचा दंड वसूल केला गेला. मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद