औरंगाबाद : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.एस्सी. अॅग्रिकल्चर व हॉर्टिकल्चर शाखेची प्रवेशपूर्व परीक्षा २९ जून रोजी होणार आहे; परंतु शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना आॅनलाईन हॉल तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची धावपळ झाली. राज्यातून एक हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सेंटरशी संपर्क साधला असता आम्ही काही करू शकत नाही. विद्यापीठाच्या संकेत स्थळावर पाहा, असे सांगितले जात आहे.यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. विद्यापीठ प्रशासनाने शनिवारी दुपारी ४ वाजेनंतर आॅनलाईन हॉल तिकीट अपडेट केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले; परंतु अचानक विद्यापीठाने हॉल तिकीट अपलोड करण्याची पद्धत बदलल्यामुळे अनेक विद्यार्थी शनिवारपर्यंत हॉल तिकिटापासून वंचित राहिले. लोकमत प्रतिनिधीने विद्यापीठाच्या विभागीय केंद्राशी संपर्क साधला असता केंद्र संचालक दिलीप पोकळे म्हणाले की, केंद्रावरही अनेक विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार नाही अशांना रविवारी परीक्षा सेंटरवर हॉल तिकीट देण्याची व्यवस्था केली आहे.वेबसाईट अपडेट होतेयपरीक्षेच्या एक दिवस आधी हॉल तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे काय करावे सुचत नव्हते. विद्यापीठाशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही वेबसाईट अपडेट करीत आहोत. थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा, असे सांगितले.-आशिष लकडेआर्थिक भुर्दंड सहन करावा हॉल तिकीटसाठी कॉलेजशी संपर्क साधला असता विद्यापीठाच्या वेबसाईटवरून आॅनलाईन डाऊनलोड करा, असे सांगितले गेले. गेल्या पाच दिवसांपासून इंटरनेट कॅफेवर हॉल तिकीट घेण्यासाठी जातोय; पण ते मिळाले नाही. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.-मजहर शेखपरीक्षेला बसता येईल का?विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये म्हणून, या कामी कॉलेज आणि विद्यापीठाने सहकार्य करणे गरजेचे आहे; पण परीक्षेच्या एक दिवस आधी हॉल तिकीट न मिळाल्यामुळे मला परीक्षा देता येईल की नाही, अशी चिंता आहे.-योगेश पवळ
अनेक विद्यार्थी हॉल तिकिटाविनाच
By admin | Published: June 29, 2014 12:45 AM