लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील रामलीला मैदान येथील अतिक्रमण महसूल विभागाने हटविले आहे. त्यामुळे या मोकळ्या जागेचा वापर कशासासाठी होणार हा सर्वांना प्रश्न पडत आहे. या मोकळ्या जागेत क्रीडांगण व धावपट्टी उभारण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.शहरातील रामलीला मैदानावरील अतिक्रमण तगड्या पोलीस बंदोबस्तात महसूल व पालिका प्रशासनाच्या वतीने २२ जुलै रोजी हटविण्यात आले. येथील छोटी-मोठी दुकाने काढून मैदान भुईसपाट करण्यात आल्याने आता छोट्या व्यापाºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. टपरी, खोकाधारकांना मात्र अद्याप पर्यायी जागा उपलब्धतेबाबत चर्चा अथवा निर्णय घेण्यात आला नाही. परंतु प्रशासनाने अतिक्रमण हटावची कार्यवाही केल्याने शहरातील अनेक खोकाधारकांना धडकी भरली आहे. पालिकेच्या हद्दीतील अतिक्रमण हटावचा मुहुर्ताची अजून तरी तारीख निश्चित झाली नाही. तारीख जाहीर होताच शहरातील अतिक्रमण हटविले जाणार आहे. याबाबत प्रक्रिया सुरू आहे.
मोकळ्या जागेत होणार क्रीडांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:50 AM