शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मराठा समाज सरकारविरोधात पुन्हा आक्रमक; 28 फेब्रुवारी रोजी मंत्रालयावर धडकणार लाँग मार्च

By बापू सोळुंके | Published: February 17, 2023 2:55 PM

राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा

औरंगाबाद: मराठा समाजांच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्यावतीने पून्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 28 फेब्रुवारी रोजी कायगाव टोका (ता. गंगापूर)येथील शहीद काकासाहेब शिंदे यांच्या स्मारक स्थळावरून मुंबईतील मंत्रालयावर चार चाकी वाहनांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटिल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाटिल म्हणाले की, हा लाँग मार्च काय गाव येथून अहमदनगर मार्गे चाकण येथे जाऊन मुक्कामी राहून दुसर्‍या दिवशी 1 मार्च रोजी मुंबईत पोहोचेल. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल यांनी सहा महिन्यात एकाही बैठक घेतली नाही. मराठा आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटिल यांना आस्था नाही, यामुळे त्यांची या पदावरून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

मराठा आरक्षण चा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व शैक्षणिक सवलती देण्यात याव्या अशी मागणी समाजाने लावून धरली आहे. मात्र या मागणीकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते . समन्वयक रवींद्र काळे पाटील म्हणाले की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे घेतलेल्या मेळाव्यातून पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. बँका तरुणांना कर्ज उपलब्ध करून देत नाहीत, ही बोंब जग जाहीर असताना या मेळाव्यात किती तरुणांना बँकांनी कर्ज मंजूर केले, याचा जाब अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना आम्ही विचारणार आहोत.

राज्य सरकारला आम्ही मराठा आरक्षण संदर्भात एक टाईम बॉण्ड देतो विशिष्ट मुदतीत हा प्रश्न मार्गी लावावा तोपर्यंत राज्यात शासकीय नोकर भरती घेऊ नये अशी आमची मागणी आहे .प्रा. माणिकराव शिंदे म्हणाले की, 10 टक्के ईडब्लूएस आरक्षण केंद्र सरकारने जसे मंजूर केले तसेच आरक्षण मराठा समाजाचे मंजूर करावे, यासाठी आम्ही केंद्र सरकारला भेटणार आहोत. मराठा समाजाचे मत तुम्हाला हवे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षण संसदेत मंजूर करावे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद