औरंगाबाद : वसमत (जि. हिंगोली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर चढून पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार राजू नवघरे (MLA Raju Navghare) यांचा निषेध करीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केम्ब्रीज चौकात त्यांचा पुतळा जाळला, ( Maratha Kranti Morcha burns statue of MLA Raju Navghare) अचानक झालेल्या या आंदोलनाची खबर पोलिसांना नव्हती.
वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी महाराजांच्या अश्वावर चढून आ. राजू नवघरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे पूजन केले. छत्रपतींच्या अश्वावर चढून हार घालणे म्हणजे महाराजांचा अवमान करणे होय, असा आरोप शिवप्रेमींनी केला. याबाबतची व्हिडिओ क्लीप समाजमाध्यमावर कालपासून व्हायरल झाली. आमदार नवघरे यांच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केम्ब्रीज चौकात गुरुवारी आंदोलन केले. आ. नवघरेंच्या पुतळ्याचे दहन केले आणि त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या. या आंदोलनात नीलेश ढवळे पाटील, संतोष काळे, नंदू गरड, गणेश उगले, हेमंत कर्डिले, प्रशांत परदेशी, शैलेश भिसे, सोमू बामणे आदींनी सहभाग घेतला.
हेही वाचा :- राजकीय प्रगल्भतेचे दर्शन; आमदार राजू नवघरे यांच्याबद्दलच्या व्हायरल व्हिडीओचा सर्व स्तरातून होतोय निषेध- 'त्या कार्यक्रमात अनेक नेते उपस्थित होते, पण फक्त माझाचा व्हिडिओ व्हायरल केला'; आमदार राजू नवघरेंचे स्पष्टीकरण