औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथे सुरुवात झाली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, औरंगाबादमधील धरणे आंदोलन बेमुदत करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. यामुळे मराठवाड्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू औरंगाबाद होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना दिला इशारा मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जावे. जर निर्णय न घेता मुख्यमंत्री जाणार असतील तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.