खुलताबाद ( औरंगाबाद ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्यातील बाजार सांवगी येथील इंदापूर फाटा येथे आंदोलकांनी बसची तोडफोड केली. तसेच बसला आग लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली.
औरंगाबाद ते दरेगाव मार्गे बाजारसांवगी ही बस (क्रमांक एम.एच. 20 डी.8486 ) आज सकाळी बाजार सांवगी येथून दरेगावकडे निघाली. यावेळी इंदापूर फाटा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी बसला अडवले. बसची तोडफोड करत आंदोलकांनी आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी तात्काळ आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.