शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पुन्हा सलग नऊ दिवस उपोषणामुळे मनोज जरांगे यांचे १२ किलो वजन घटले

By बापू सोळुंके | Published: November 04, 2023 3:33 PM

प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील यांना दिवाळीतही राहावे लागणार रुग्णालयात

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात १७ दिवस उपोषण केल्यानंतर सव्वा महिन्यातच सलग ९ दिवस दुसरे उपोषण केल्यामुळे मनोज जरांगे - पाटील यांची प्रकृती खालावली. यामुळे गुरुवारी रात्री त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांना उलट्याही झाल्या. आता त्यांना ठणठणीत होण्यासाठी दिवाळीपर्यंत दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे - पाटील यांनी सप्टेंबर महिन्यात सलग १७ दिवस उपोषण केले होते. शासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी ४० दिवस उपोषण स्थगित केले होते. शासनाने मागणी पूर्ण न केल्याने जरांगे - पाटील यांनी २५ ऑक्टोबरनंतर सलग नऊ दिवस उपोषण केले. यातील काही दिवस त्यांनी पाणीही न प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. यामुळे गुरुवारी रात्री त्यांना शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून डॉ. विनोद चावरे आणि डॉ. अमोल खांडे हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना डॉ. अभिमन्यू माकणे यांनी सांगितले की, जरांगे - पाटील यांनी त्यांच्या सप्टेंबरमधील उपोषणानंतर आराम न करता राज्यभर दौरे आणि सभा घेतल्या. यानंतर २५ ऑक्टोबरपासून सलग दुसरे उपोषण केल्याने त्यांचे सुमारे १२ किलो वजन घटले. पाणी न प्यायल्यामुळे त्यांच्या शरीरातील स्नायूही आकुंचन पावत होते. रात्रीपासून आम्ही त्यांच्यावर उपचार सुरू केले. शुक्रवारी दुपारी त्यांना उलट्यांचा त्रास झाला. त्यांना पूर्णपणे ठणठणीत होण्यासाठी पुढील दहा ते बारा दिवस रुग्णालयात राहावे लागेल.

जरांगे यांना भेटण्यासाठी गर्दीजरांगे हे रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच, छत्रपती संभाजीनगर शहरातील समाजबांधव आणि अंतरवाली सराटी येथील गावकऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी त्यांची भेट घेतली. शिवाय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही रुग्णालयासमोर ठाण मांडून आहेत. मात्र, डॉक्टरांनी त्यांना काेणालाही भेटायला मनाई केली आहे. शिवाय त्यांच्या संरक्षणासाठी दोन बाऊन्सर तेथे नियुक्त केले आहेत.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद