औरंगाबाद : मराठा समाजाला दिलेले आरक्षण विद्यमान महाविकास आघाडी सरकारला टिकवता आले नाही. आता काही लोक आरक्षणासाठी मोर्चा काढत आहेत. त्या मोर्चात आरक्षणाला विरोध करणारे सहभागी होत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी केला. शिवसंग्रामतर्फे मराठा आरक्षण संघर्ष मेळाव्याचे आयोजन श्रीहरी पव्हेलियन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मोर्चात खासदार, आमदार, मंत्री आंदोलनात येऊन बोलले. त्यांनी कधीतरी स्वतःच्या पक्षाकडे, अधिवेशनात काहीतरी बोलले पाहिजे, असेही मेटे म्हणाले. आज ओबीसी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी थोड लक्ष घातले असते तर ओबीसींना रस्त्यावर येण्याची गरज पडली नसती. आता हे मंत्रीच ढोंग करीत आहेत अशी टीकाही यावेळी मेटे यांनी केली.
सारथीची सर्व विभागात कार्यालय हवीत सारथी सस्थेचे केंद्र मराठवाड़ा, खान्देश, विदर्भ आणि कोकणात आवश्यक आहे. मात्र, मुख्यालय पुण्यात आणि विभागीय कार्यालय कोल्हापुराला स्थापन करीत आहेत. हे चुकीचे असल्याचे ही मेटे यांनी सांगितले.