शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

मराठा आरक्षण: हैदराबादमधील निजामकालीन जनगणनेच्या ५ हजार दस्तांचे स्कॅनिंग होणार

By विकास राऊत | Published: July 11, 2024 12:05 PM

मराठा आरक्षणासाठी सरकार अॅक्शनमध्ये; समितीला नव्याने काही पुरावे सापडले नाहीत. परंतु, मंत्रालयीन पातळीवर निजामकालीन जनगणनेच्या पुराव्यांचे विश्लेषण होईल.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीला सुरुवात करताच राज्य शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रासाठी स्थापन केलेल्या सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचे आठ सदस्य पुन्हा हैदराबादला गेले आहेत. तेथील निजामकाळात झालेल्या जनगणनेच्या रेकॉर्डच्या सुमारे हजार दस्तांचे स्कॅनिंग करून त्या प्रती शासनाला साेपविण्यात येणार आहेत. यासाठी येणारा खर्च शासन करणार आहे. स्कॅनिंगसाठी किती काळ लागेल, हे अद्याप स्पष्ट नाही. समितीचे सदस्य परतीच्या प्रवासावर असून, ते गुरुवारी महाराष्ट्रात येतील.

हैदराबाद गॅझेटमधील जनगणना आणि इतर नोंदी घेऊन ही समिती परतणार आहे. समितीला नव्याने काही पुरावे सापडले नाहीत. परंतु, मंत्रालयीन पातळीवर निजामकालीन जनगणनेच्या पुराव्यांचे विश्लेषण होईल. पथकात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव, दोन उपसचिव, विभागीय उपायुक्त जगदीश मिनियार व सदस्यांचा समावेश आहे. बुधवारी समितीने हैदराबादमधील गॅझेटच्या नोंदी शोधून त्याच्या सत्यप्रती मिळविल्या.

सर्व नोंदी, पुरावे घेऊन समिती गुरुवारी परतीच्या प्रवासाला लागेल. सापडलेले सर्व पुरावे, दस्तऐवज मंत्रालयात सोपविले जातील. त्याचे विश्लेषण करून मराठा आरक्षणासाठी सापडलेले पुरावे किती उपयुक्त ठरणार, हे पाहिले जाईल. मिनियार यांनी सांगितले, पुराव्यांच्या शोधासाठी हैदराबादेत पुरातत्व विभागातून माहिती संकलित केली आहे.

नवीन काहीही सापडले नाहीहैदराबादमधून समिती सदस्य परतीच्या प्रवासावर आहेत. नवीन काहीही सापडले नाही. परंतु, जनगणनेच्या याद्या स्कॅन करून शासनाला पाठविणार आहेत. त्यामध्ये जातनिहाय जनगणनेच्या नोंदी असून, त्या जशा आहेत, तसेच त्याचे स्कॅनिंग करण्यात येईल. स्कॅनिंगला बराच वेळ लागेल. कारण सगळा रेकॉर्ड जीर्ण झाला आहे. यासाठी येणारा खर्च राज्यशासन तेलंगणा सरकारला अदा करील.- जगदीश मिनियार, उपायुक्त

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षणDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयTelanganaतेलंगणा