शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 9:55 AM

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते.

Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केलं आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करीत असल्याचे घोषित केले.

मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी आपले उपोषण थांबवले. १४ दिवसानंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केले. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह  शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल सायंकाळी उपोषण स्थळी जाऊन उंबरे यांची भेट घेतली.

दीपक केसरकर यांनी उंबरे यांच्या मागण्यानिहाय प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करुन राजश्री उंबरे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शंकानिरसन केले. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेनंतर उंबरे यांनी आपण उपोषण स्थगित करीत असल्याचे स्वतः माध्यमांना सांगितले.

शिष्टमंडळाने घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

राजश्री उंबरे यांच्या वतीने सात सदस्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले होते. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं होतं.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदे