शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

शासनाच्या शिष्टमंडळाच्या भूमिकेवरच आंदोलनाची दिशा ठरणार; उपोषणकर्त्या राजश्री उंबरे

By बापू सोळुंके | Updated: September 14, 2024 16:55 IST

आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. मात्र, शासनाने लेखी असे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.

छत्रपती संभाजीनगर: शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उद्या रविवारी उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्यासाठी शासनाकडून लेखी आश्वासन काय मिळते, यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे उंबरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.  १७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास १८ ला आपण राहणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला. 

हैदराबाद संस्थानचे गॅझेट लागू करून मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, ईडब्ल्यूएस आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि शेतकरी,शेतमजूर ,कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे, यामागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्यावतीने राजश्री उंबरे या २ सप्टेंबरपासून क्रांतीचौकात उपोषण करीत आहेत. शनिवारी त्यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस होता. त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर आज शिष्टमंडळाने पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका जाहिर केली.

उमरे म्हणाल्या की, आमच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा केली. मात्र, शासनाने लेखी असे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. उद्या रविवारी मंत्री दिपक केसरकर आणि पालकमंत्री अब्दुल सत्तार हे सरकारच्यावतीने भेटण्यासाठी येणार आहे. मागण्यासदंर्भात सरकार काय निर्णय घेते, यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे उमरे यांनी नमूद केले.

संघटनेचे प्रवक्ता प्रवीण नागरे म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवरून ते आमच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक वाटले.परंतु धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळ मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, आता त्यांचे मंत्री तुमच्या मागण्या मान्य करतील असे वाटते का, या प्रश्नाचे उत्तर देताना  नागरे म्हणाले सरकार वेळकाढूपणा करतेय असे वाटते. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन सुरूच ठेवले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद