मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने दाखल केलेली रिव्ह्यू पिटीशन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली. असे असले तरी आपण स्वत: दाखल केलेली रिव्ह्यू पिटीशन आणि राज्य सरकारच्या याचिकेवर निर्णय अजून झालेला नाही. ही लढाई आपणच जिंकू यामुळे मराठा तरुणांनी संयम सोडू नये, असे आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले. ते म्हणाले की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला अथवा राज्याला या एकाच मुद्द्यावर केंद्र सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय आला आणि केंद्र सरकारचे म्हणणे अमान्य केले. एखाद्या समाजाला आरक्षणाचा अधिकार केंद्रालाच असल्याचे नमूद केले. आता राज्य आणि केंद्र सरकारचे अधिवेशन होत आहे. राज्य सरकारने याविषयी ठराव घेऊन केंद्र सरकारकडे पाठवावा आणि मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.
मराठा तरुणांनी संयम ठेवावा, लढाई आपणच जिंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:04 AM