शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

सिंचनात अधोगतीकडे वाटचाल; बिनशर्त सहभागी झालो तरी मराठवाड्याच्या नशिबी संघर्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 2:16 PM

Marathawada Muktisangram Din : नागपूर करारातील मुद्दा क्रमांक ४नुसार मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे होते.

- शं. आ. नागरे, तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा विकास मंडळ, औरंगाबाद विभाग

मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. नंतर संयुक्त महाराष्ट्रात मराठवाडा बिनशर्त सामील झाला. नागपूर करारातील मुद्दा क्रमांक ४नुसार मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, ७३ वर्षांत याकडे दुर्लक्ष झाले असून, विशेषत: मराठवाड्याची सिंचनाच्या दृष्टीने अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. १९६० साली मराठवाड्यात फक्त ०.१२ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. या प्रदेशाच्या सिंचन विकासासाठी स. गो. बर्वे आयागोची स्थापना झाली. त्यानंतर सिंचन कामांना वेग मिळाला. मात्र, १९७३ नंतर राज्यात नागपूर करार डावलून जिल्हानिहाय नियोजन प्रक्रिया सुरू झाली. याचा परिणाम मराठवाड्यावर अधिक झाला. विदर्भ आणि मराठवाड्यावरील परिणामांची कारणीमिमांसा करण्यासाठी वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन झाली. मात्र, समितीचा अहवाल शासनाने विचारात घेतला नाही.

१९६०ला मराठवाड्यात ०.१२ लक्ष हेक्टर, १९८२ साली ५.७ लक्ष हेक्टर, २०१० साली १०.५ लक्ष हेक्टर, तर २०१९ साली ११.६४ लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. एकूण राज्याच्या प्रमाणात हे प्रमाण २० टक्के आहे. विदर्भ २२ टक्के व उर्वरित महाराष्ट्र २९ टक्क्यांवर असल्यामुळे मराठवाडा सिंचन तरतुदीत मागे असल्याचे स्पष्ट होत आहे. २०३०पर्यंत राज्यातील सिंचन विकासाच्या नियोजनात मराठवाड्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मराठवाड्यात १६ हजार ३८५ कोटींची ५५ कामे सुरू आहेत. विदर्भात ४३ हजार ५६१ कोटींची १२३ कामे, तर उर्वरित महाराष्ट्रात ४९ हजार ४४४ कोटींची १३५ कामे सुरू आहेत. एकूण १० हजार कोटींतील ३१३ कामांत 

मराठवाडा ५० टक्क्यांनी मागे आहे.येत्या १० वर्षांत राज्य सिंचन विकासात सरासरी ३०.६० टक्क्यांवर जाईल. यात उर्वरित महाराष्ट्र ३५.१० टक्के, विदर्भ ३१.६० टक्क्यांवर असेल. परंतु मराठवाडा फक्त २१.८० टक्क्यांवर असेल. मराठवाड्याचा सध्याचा ४.६० टक्के अनुशेष ८.८० टक्क्यांवर जाईल. मराठवाड्यात १० वर्षांत फक्त २६ कामे पूर्ण होतील. शासनाने १० वर्षांसाठी ३९ हजार कोटींच्या पॅकेजमधून सिंचन विकासाचे धोरण आखले आहे. यात मराठवाड्यावर फक्त ९ टक्के रक्कम खर्च होईल. विदर्भात ५७, तर उर्वरित महाराष्ट्रात ३४ टक्के रक्कम खर्च होणार आहे.

...तर अनुशेषासाठी लढण्याचा हक्कदेखील जाईलमराठवाडा, विदर्भ विकासासाठी १९९४ साली राज्यात तीन वैधानिक विकास महामंडळांची स्थापना करण्याचा निर्णय झाला. सिंचन विभागाच्या अनुशेषावर महामंडळाने लक्ष वेधले. उर्वरित महाराष्ट्र, विदर्भाला सिंचनाच्या बाबतीत झुकते माप दिले गेले. महामंडळाचे यश व अपयश या बाबींकडे न जाता मराठवाड्याला सिंचनाच्या बाबतीत सक्षम करणे आगामी काळात गरजेचे असावे. पाणी आणि अनुशेषाचा प्रश्न विभागनिहाय मांडण्यासाठी नागपूर करार आणि राज्य घटनेतील तरतुदीनुसार शासन वैधानिक विकास महामंडळात मोडीत काढत असेल तर प्रादेशिक अनुशेषासाठी लढण्याचा हक्क तरी मराठवाड्याला पुढील काळात शिल्लक राहणार आहे काय, असा प्रश्न आहे. मराठवाड्यातील जनता आणि शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शेती वाचविण्याची आणि सिंचन वाढविण्याची गरज आहे. ( शब्दांकन - विकास राऊत )

हेही वाचा - - झोळी रितीच ! मराठवाड्याचा कालबद्ध कार्यक्रम अंमलबजावणी अभावी कागदावरच- निजामाच्या पोलीस ठाण्यावर फडकावला तिरंगा; सशस्त्र लढाईत रजाकारांना कोलते पिंपळगावकरांनी आणले होते जेरीस 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार