औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी ‘रन फॉर इक्वॅलिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
या मॅरेथॉनचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशन (दामा), युनायटेड युथ फोरम, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना व परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन विद्यापीठच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सकाळी ६ वाजता सुरू होईल. समारोपही तेथेच होणार आहे.
ही मॅरेथॉन १६ वर्षांखालील आणि खुल्या गटात आयोजित करण्यात आली आहे. या मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. प्रभा खरे, डॉ. महेश राजीले, डॉ. राहुल जावळे, अविनाश कांबळे, डॉ. अमित जोगदंड, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. मनीषा अंभोरे, मनीष बागूल, राहुल अंभोरे, सम्यक खैरे, डॉ. रूपेश आदींनी केले आहे.