औरंगाबाद : मराठवाड्यातील कोविड सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर कमी होत आले असून, त्याची माहिती प्रशासकीय पातळीवर घेणे सुरू आहे. कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे क्वारंटाईन सेंटर्समध्ये संसर्ग लक्षणे असलेल्या नागरिकांचे प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे सेंटर्स बंद करण्यात येत आहेत, तसेच कन्टेंटमेंट झोनची संख्याही कमी झाली आहे. २,२३० झोन सध्या आहेत.
अडीच महिन्यांपूर्वी ८० हजार नागरिक विभागातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये अलगीकरणाच्या उद्देश्याने उपचार घेत होते. ते प्रमाण २५ ऑक्टोबर रोजी ६ हजारांवर आले आहे. सौम्य लक्षणे किंवा लक्षणे नाहीत अशांना घरीच राहून उपचार करता येण्याबाबत सूचना असल्या तरी त्यास रुग्णांपासूनच इतरांना आजाराची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्य, संपर्कात आलेल्या, लक्षणे दिसून येत आहेत त्यांना घरी न ठेवता त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावे लागणार आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी जून महिन्यात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महसूल उपायुक्तांची माहिती अशीमहसूल उपायुक्त पराग सोमण यांनी सांगितले, कोविड केअर सेंटर आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर कमी झाले आहेत. जिल्हानिहाय काय परिस्थिती आहे, त्याची माहिती घेण्यात येत आहे.
होम क्वारंटाईनचा आकडा मोठाइन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाईनचा आकडा कमी आणि होम क्वारंटाईनचा आकडा मोठा झाला आहे. ७७ हजार ६१७ नागरिक सध्या होम क्वारंटाईन आहेत. औरंगाबादमध्ये १२ हजार ५४९, नांदेडमध्ये २५ हजार ५०९, परभणीत २७५, लातूर ६१२, जालना ३१०, बीड ३२ हजार ९९४, हिंगोली १५ आणि उस्मानाबादमध्ये ५ हजार ३५३ नागरिक होम क्वारंटाईन आहेत.