लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ८० टक्केही पाऊस न पडल्याने दिवसेंदिवस चिंता वाढते आहे. पावसाचे दोन महिने उलटूनही अर्धा महाराष्टÑ कोरडाच आहे.पावसाच्या विश्रांतीमुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाची सरासरी न ओलांडणाºया राज्यातील जिल्ह्यांची संख्या दहावरून चौदा झाली. त्यात मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्हे आहेत. मराठवाड्यात यंदा पावसाळ्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र जुलैमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे निम्म्याहून अधिक मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.दुबार पेरणीचे संकट ओढवलेले असताना अधूनमधून होणाºया तुरळक पावसाने दिलासा दिला. गुरूवारी शहरात तुरळक पाऊस पडला. परभणी, हिंगोली जिल्ह्यात तर ऐन पावसाळ्यात तापमान वाढत आहे. शेतातला ओलावा नष्ट होत चालला आहे व पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. बºयापैकी तग धरून असलेल्या पिकांवर रोग, अळी, किडींचा प्रादुर्भाव होत आहे. उपलब्ध पाण्याचा वापर करून शेतकºयांना पिके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. मराठवाड्यातल्या तलाव व धरणांमध्येही पुरेसा पाणीसाठा नाही. वरच्या भागात पाऊस झालेला असल्याने पैठणच्या जायकवाडी धरणात ५१ टक्केच्या पुढे पाणीसाठा झाला आहे. वरून पाण्याचा विसर्ग चालू आहे; पण त्याचे प्रमाण आता फार मोठे नाही.मराठवाड्यात आणखी आठवडाभर पाऊस येण्याची चिन्हे नाहीत. ९-१० आॅगस्टनंतरच पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसासंबंधीची हवामान खात्याने केलेली भाकिते साफ खोटी ठरली आहेत. जून महिन्यात मराठवाड्यात सरासरी १४१.५ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. तो पडला १७१ मिलिमीटर म्हणजे ११७ टक्के. जून अखेरपासूनच पावसाने ओढ दिली. बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहू लागला. जुलै महिन्यातही पावसाचा खंड कायम राहिला. जून- जुलै महिन्यात ३५ दिवस कोरडे गेले. चोवीस तासांत सरासरी अडीच ते तीन मिलिमीटर पाऊस पडल्यास तो दिवस रेनी डे म्हणून गणला जातो. जून महिन्यात १७ दिवस तर जुलै महिन्यात ९ दिवस पावसाने हजेरी लावली.
मराठवाड्यात सरासरीच्या ८० टक्केही पाऊस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 1:16 AM