लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू होऊन पावणेदोन महिने पूर्ण होत आहेत. तरी मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला नाही. परिणामी, मोठ्या, मध्यम धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे.
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागाकडेही मुसळधार पावसाने पाठ फिरविल्यामुळे जायकवाडी प्रकल्पात केवळ ४.३ टक्के जिवंत जलसाठा उरला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी आजच्या दिवशी प्रकल्पात २७.६५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आहे.
तीन प्रकल्प कोरडेमराठवाड्यातील सीना कोळेगाव, मांजरा आणि मांजलगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा आहे. ७५० लघुप्रकल्प कोरडेगतवर्षी अत्यल्प पावसामुळे सुमारे ९० मध्यम प्रकल्प आणि ७५० लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत.
नाशिकमध्ये १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठानाशिक : जिल्ह्यातील धरणसाठा केवळ ३३ टक्के असल्याने नाशिकमध्ये जलसंकट उद्भवले आहे. ऐन पावसाळ्यात नाशिकमध्ये १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर खरिपाच्या पेरण्या होऊनही पाऊस गायब झाल्याने बळीराजाही चिंतेत आहे. सर्वाधिक पाऊस देवळा तालुक्यात १५३ टक्के झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, बागलाण, सिन्नर, मालेगाव, येवला आणि नांदगाव या सात तालुक्यांमध्ये एकूण १७४ गावे आणि ५६६ वाड्यांना १८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात सर्वाधिक ३६ टँकर नांदगाव तालुक्यात सुरू आहेत.
इच्छागव्हाणला लागली गळतीनंदुरबार : तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण लघु प्रकल्पाला गळती लागल्याने प्रकल्प फुटण्याची भीती आहे. प्रकल्पात प्रथमच पाणीसाठा झाला आहे. प्रकल्प फुटल्यास पाच गावांना धोका निर्माण होऊ शकतो.
जलसाठा किती टक्के? धरण आजचा गतवर्षीची साठा स्थितीजायकवाडी ४.३ २७.६५ निम्न दुधना ६.४० २७.३८ येलदरी ३०.८ ५७.८८ सिद्धेश्वर ५.६६ ९.८७ पैनगंगा ४० ४८.८० मानार २७.३६ ३५.६ निम्न तेरणा २५ २७.६० विष्णूपुरी ७० ५३.६१ माजलगाव ०० १६.२८ मांजरा ०० २३.२४ सीना कोळेगाव ०० उणे १४