छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सव, तसेच मंत्रिमंडळ बैठकीमुळे उद्या (१६ सप्टेंबर) दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे. क्रांती चौकात सायंकाळी लेझर शो, मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांचे दौरे, विविध संघटनांचे आंदोलन, मोर्चे निघणार आहेत. त्यामुळे संबंधित मार्गांवर सामान्यांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाच्या मार्गांमध्ये बदल करून काही मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या वेळेत हे मार्ग टाळाच-सकाळी ७ ते १० शहानूरमियां दर्गा चौक ते सूतगिरणी चौक.-सकाळी ७ ते सायंकाळी ५ भडकलगेट ते अण्णाभाऊ साठे चौक-सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान क्रांती चौक, अजबनगर, बंडू वैद्य चौक, सावरकर चौक, निरालाबाजार, नागेश्वरवाडी, खडकेश्वर टी पॉइंट, सांस्कृतिक मंडळ, जुबिली पार्क, भडकलगेटपर्यंत.-सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत वोक्हार्ट टी ते लहुजी साळवे चौक मार्गे जय भवानी चौकापर्यंत, लहुजी साळवे चौक ते कलाग्राम मार्गे (ब्लू वेल सोसायटी चौक) व कलाग्राम ते आयुष पेपर मिलपर्यंत.
क्रांती चौक रात्री १२ पर्यंत बंदमराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाचे सर्वाधिक कार्यक्रम क्रांती चौकात आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत गोपाल टी ते सिल्लेखाना व क्रांती चौक उड्डाणपुलाची पूर्व बाजू आणि क्रांती चौक उड्डाणपुलाच्या पश्चिम बाजूचा सर्व्हिस रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे.
पार्किंग व्यवस्था-मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणारे मोर्चेकरी व निवेदनकर्त्यांच्या वाहनांसाठी कर्णपुरा मैदानावर पार्किंगची व्यवस्था असेल.-चिकलठाण एमआयडीसीतील कलाग्राम समोरील रिद्धी सिद्धी लॉन्सवरील कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी-गरवारे मैदानाजवळील पार्किंग-नवजीवन गतिमंद मुलांची शाळा कॉर्नर समोरील पार्किंग (जुनी रोलेक्स मेटल कंपनीचे मैदान)-जय भवानी चौक, नारेगाव शेजारील मोकळे मैदान