शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मराठवाड्यात आजवर ६८ टक्के पाऊस; ऑगस्ट महिन्याची सुरुवात कोरडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 1:51 PM

Rain in Marathwada : जून आणि जुलै या दोन महिन्यात मराठवाड्यात ३२० मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४६५ मि. मी. पाऊस झाला

ठळक मुद्देपावसाळ्याचे दोन महिने उलटले असून विभागात ऑगस्ट महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षायंदा ‘ॲटोमेटिक वेदर स्टेशन’द्वारे पावसाची सरासरी घेतली जात आहे. मंडलनिहाय पावसाची आकडेवारी देण्याऐवजी तालुकानिहाय आकडेवारी संकलित

औरंगाबाद : यंदाच्या पावसाच्या हंगामात मराठवाड्यात आजवर सरासरीच्या तुलनेत ६८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाळा ऋतू सुरू होऊन दोन महिने उलटले असून, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्याने विभागात पर्जन्यमानाचा टक्का वाढला नाही.

यंदा ‘ॲटोमेटिक वेदर स्टेशन’द्वारे पावसाची सरासरी घेतली जात आहे. त्यामुळे मंडलनिहाय पावसाची आकडेवारी देण्याऐवजी तालुकानिहाय आकडेवारी संकलित केली जात आहे. त्यात सरासरी झालेला पाऊस आणि टक्केवारी इतकी त्रोटक माहिती प्रशासनासमोर आणते आहे. तसेच विभागातील काही जिल्ह्यातील वार्षिक पर्जन्यमानाची सरासरीदेखील कमी करण्यात आली आहे. औरंगाबाद ६७५वरून ५८१ मि.मी. अशी वार्षिक सरासरी आता गृहीत धरण्यात आली आहे. जालना आणि बीडची सरासरी कमी करण्यात आली आहे. विभागाची एकूण सरासरी ६७९ मि. मी. असून, त्या आधारावर आजपर्यंत जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या अनुमानावर ६८ टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी प्रसिध्दीस देण्यात आहे.

जून आणि जुलैमध्ये झालेला पाऊसजून आणि जुलै या दोन महिन्यात मराठवाड्यात ३२० मि.मी. सरासरीच्या तुलनेत ४६५ मि. मी. पाऊस झाल्याचे अहवालात नमूद आहे. १४५ टक्के पाऊस झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ऑगस्टमध्ये विभागात ८.४ टक्के पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यात ५८१ मि.मी., जालना ६०३ मि.मी., बीड ५०६, लातूर ७०६, उस्मानाबाद ६०३, नांदेड ८१४, परभणी ७६१, तर हिंगोलीत ७९५ मि.मी. सरासरी पावसाचे अनुमान गृहीत धरले आहे. आजवर औरंगाबादमध्ये वार्षिक सरासरीच्या ५७ टक्के, जालना ७८ टक्के, बीड ६९ टक्के, लातूर ६१ टक्के, उस्मानाबाद ५७ टक्के, नांदेड ७५ टक्के, परभणी ७५ टक्के, तर हिंगोलीत ७० टक्के पाऊस झाल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाला दिला आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊसAurangabadऔरंगाबाद