औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहेऔरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे अद्यापही ठरत नाही. एमआयएमने स्वतंत्र उमेदवार दिल्यास वंचित बहुुजन आघाडीत फूट पडण्याची चिन्हे आहेत.नांदेडला ५१ जणांनी ९३ अर्ज नेले. फक्त एका अपक्षाने अर्ज दाखल केला. लातूरला १५ जणांनी ३८ अर्ज दाखल केले. पण एकानेही दाखल केला नाही. साऱ्या राज्याचे लक्ष असलेल्या बीड मतदारसंघातही पहिल्या दिवशी कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यातल्या त्यात नांदेडलाच काँग्रेस व भाजपे उमेदवार आज- उद्याच जाहीर होण्याची शक्यता आहे. उस्मानाबादला काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे नाव चर्चेत आल्याने काँग्रेस व राष्टÑवादीत खलबते चालू आहेत. जालन्याला खोतकरांनी अर्जुनास्त्र मागे घेतल्याने दानवेंची डोकेदुखी कमी झाली असली तरी त्यांच्याविरुद्ध आघाडीतर्फे कोण; हे अजूनही स्पष्ट नाही.
मराठवाड्यात राजकीय सामसूम; उमेदवार ठरेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 6:07 AM