शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

मुदतवाढ न मिळाल्याने मराठवाडा वैधानिक विकास मंडळात आता उरले केवळ तीन कर्मचारी!

By स. सो. खंडाळकर | Published: April 08, 2024 4:43 PM

घटनात्मक तरतुदीनुसार हे मंडळ अस्तित्वात यावे, यासाठी गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्यासारख्यांनी केलेला संघर्ष आता केवळ आठवणींपुरता शिल्लक राहिलेला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आता फक्त नावालाच शिल्लक उरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालगतचे मंडळाचे कार्यालय आता ओसच पडले आहे. तिथे कुणी येते ना जाते.

३० जूनला या मंडळाचे सदस्य सचिव विजयकुमार फड निवृत्त झाले. ते पदोन्नतीने आयएएस दर्जा प्राप्त केलेले अधिकारी होते. आयएएस मिळताच ते धाराशिव जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले आणि अवघ्या काही महिन्यांतच त्यांची बदली मराठवाडा वैधानिक विकास मंडळात झाली. खरे तर ही ‘साइड पोस्ट’. चांगल्या पोस्टची प्रतीक्षा करीतच त्यांना निवृत्त व्हावे लागले. मंडळाला मुदतवाढ नसल्यामुळे फड यांनाही दररोज कार्यालयात जाऊन बसणे, एवढेच काम करावे लागले. ते वारकरी संप्रदायाचे व कीर्तनकार असल्याने त्यांना कार्यालयातही ज्ञानेश्वरी वा अन्य ग्रंथ वाचत बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. ही अवस्था आहे वैधानिक विकास मंडळाची.

सध्या किरण गिरगावकर यांच्याकडे फड यांचा पदभार आहे. ते अर्थ व सांख्यिकी कार्यालयाचे सहसंचालक आहेत. पण त्यांच्याकडे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन उपायुक्त व वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव या पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे.कृष्णा भंडारी हे त्यांचे पीए व महसूल विभागातील एक महिला कर्मचारी सोडले तर आता वैधानिक विकास मंडळात कुणीच कर्मचारी नाहीत. मंडळाची सारी इमारत ओस पडलेली आहे. एक काळ होता, या मंडळात राबता होता.

अध्यक्ष असताना मराठवाडाभरातून लोक यायचे. विविध समित्या कार्यरत होत्या. त्यांच्या सदस्यांच्या सतत बैठका चालू असायच्या. आता बंद असल्यागतच हे मंडळ आहे. ते सुरू होण्याची लोकभावना असतानाही शासनकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. घटनात्मक तरतुदीनुसार हे मंडळ अस्तित्वात यावे, यासाठी गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा यांच्यासारख्यांनी केलेला संघर्ष आता केवळ आठवणींपुरता शिल्लक राहिलेला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाRevenue Departmentमहसूल विभाग