छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मार्च अखेरीस विभागातील पाच जिल्ह्यांतील ३९९ गावे आणि ९१ वाड्यांना ६०६ टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा होत असून एप्रिल आणि मे महिन्यांत आणखी परिस्थिती बिकट होणार आहे.मराठवाड्याची--- छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरचा आकडा सध्या आहे. त्या खालोखाल जालना शहराचा क्रमांक आहे. या दोन जिल्ह्यांत ५६५ टँकरने पाणीपुरवठा होत असून पुढील दोन महिन्यांत १ हजारांपर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती आहे.
विभागात २०२३ साली पाऊस समाधानकारक झाला नाही. १५ टक्के पावसाची तूट राहिली. परिणामी मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा कमी प्रमाणात झाला. विभागात सध्या फक्त २३.६९ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात २३ टक्के पाणीसाठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के पाणी धरणात होते. टँकरसाठी ३३२ तर त्याव्यतिरिक्त ५७० अशा ९०२ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे.
३९९ गावे, ९१ वाड्या तहानल्यामराठवाड्यातील ४०० गावे आणि ९१ वाड्या तहानल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये २३० गावे ४२ वाड्या, जालन्यात १३५ गावे, ४८ वाड्या, बीडमध्ये १६ गावे, लातूरमध्ये १ तर धाराशिव जिल्ह्यात १८ गावे तहानली आहेत.
टंचाई आराखड्यासाठी नियोजनविभागातील मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांसाठी टंचाई आराखड्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या तीन महिन्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात असून जून अखेरपर्यंत टंचाईचे नियोजन करण्यासाठी २०० कोटींहून अधिकची मागणी प्रशासन करण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात २३ टक्के पाणीमोठे प्रकल्प ...११ ..... २९.०५मध्यम प्रकल्प... ७६ .....१२.४३लघु प्रकल्प.... ७४९........१२.९२गोदावरीवरील बांधारे... १५ .....२६.८३तेरणा, मांजरा नदीवरील बंधारे ....२७..... १७.६९एकूण प्रकल्प..... ८७७...... २३.६९
कोणत्या जिल्ह्यात किती टँकरजिल्हा....................टँकरछत्रपती संभाजीनगर...३४८जालना...२१७बीड...११लातूर....१धाराशिव....२९एकूण....६०६