शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत; धरणांत केवळ ११.८७ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:12 PM

अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. महिनाभरात ४ टक्क्यांनी पाणी घटले आहे. अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

एकीकडे लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड जिल्ह्यांत पावसाने चांगली हजेरी लावली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांत अद्यापही पावसाला सुरुवात नाही. मराठवाड्यातील जलप्रकल्पांतील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहता आगामी कालावधीत दमदार पावसाची आवश्यकता आहे. गतवर्षी म्हणजे ११ जून २०१७ रोजी मराठवाड्यातील धरणांत १३.६० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी हा पाणीसाठा ११.८७ टक्के इतका आहे. दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सध्या जायकवाडीतील पाणीसाठ्यात घट होत असल्याचे चित्र आहे.

जायकवाडीमध्ये ५ जून रोजी १२६६.१०२ दशलक्ष घनमीटर म्हणजे २४.३२ टक्के पाणीसाठा होता. ११ जून रोजी हाच पाणीसाठा १२४६.४२ (२३.४१) टक्क्यांवर आला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्यानंतरच जलसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात होईल. जायकवाडीसह मराठवाड्यातील इतर जलप्रकल्पांचीही अशीच काहीशी अवस्था आहे. नांदेड येथील विष्णुपुरी जलाशयात २९.८२ टक्के पाणीसाठा उरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मांजरा धरणाच्या क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही वर्षे हे धरण पाण्याने शंभर टक्के  भरून वाहिले. त्यामुळे टंचाई भासली नाही. पिण्याच्या पाण्याची मोठी सोय झाली. सध्या मात्र या धरणात ८.२३ टक्के जलसाठा आहे. या धरणाच्या पाण्यावर सिंचनाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

अन्य जलप्रकल्पांतील पाणीसाठा निम्न दुधना प्रकल्पात १४०.८९ दलघमी (१५.८१ टक्के), येलदरी प्रकल्पात ११८.०७ दलघमी, सिद्धेश्वर प्रकल्पात १४१.१६ दलघमी, माजलगाव धरणात १५३.६० दलघमी (३.७२ टक्के), मांजरा धरणात ६२.०० दलघमी (८.२३ टक्के), निम्न मनार प्रकल्पात १४.९६ दलघमी (४.५२ टक्के), निम्न तेरणा प्रकल्पात ७२.३५ दलघमी (४६.४६ टक्के), विष्णुपुरी धरणात  २६.८५ दलघमी (२९.८२ टक्के), सिना कोळेगाव प्रकल्पात ७४.७० दलघमी (०.५३ टक्के) पाणी साठा आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाDamधरण