शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

मराठवाडा २५ दिवसांपासून विभागीय आयुक्तांविनाच; कोर्टाच्या सूचनेलाही शासन जुमानेना

By विकास राऊत | Published: June 25, 2024 12:51 PM

नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाने २० जूनपर्यंत विभागीय आयुक्त नियुक्त होतील, अशी अपेक्षा शासनाकडून ठेवली होती. परंतु न्यायालयाच्या सृूचनेला, अपेक्षेला शासनाने जुमानले नाही. २५ दिवसांपासून विभागीय कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर असून त्याचे परिणाम कामकाजावर होत आहेत. १ जूनपासून आयुक्तपद प्रभारी आहे. आजवर शासनाने ६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. परंतु मराठवाडा विभागीय आयुक्त पदासाठी शासनाने कुणाचीही बदली केली नाही.

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई आहे. पावसाळा लागला असला तरी टँकरची संख्या कमी झालेली नाही. दोन हजारांच्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक जिल्ह्यांत चाराटंचाईची शक्यता असून २५ दिवसांपासून विभागीय आयुक्त हे पद रिक्त आहे. नाशिक विभागाला तातडीने आयुक्त दिले, मग मराठवाड्याबाबत एवढा विलंब कशासाठी यावरून सरकारवर टीका सुरू झाली आहे. दुग्ध व समाजकल्याण विभागातील काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावे सुरुवातीला चर्चेला आली. तसेच अमरावती विभागीय आयुक्तांचेही नाव चर्चेत होते; परंतु त्यांच्या नावाला राजकीय वर्तुळातून विरोध असल्यामुळे ते नाव मागे पडले. काही जण सेवानिवृत्त होणार असल्याने नवीन नावांचा शोध सध्या सुरू आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न, नापिकी या सगळ्या बाबींचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्त पदावर सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणी सत्ताधारी वर्तुळाने शासनाकडे लावून धरली आहे, तर विरोधकांनी सरकार मराठवाड्याला सावत्र वागणूक देत असल्याचा आरोप केला आहे.

कोणत्या कामांवर परिणाम....टंचाईसाठी उपाययोजनांचे आढावे ठप्प.महसूल सुनावण्यांवर निर्णय होण्यात अडचणी.प्रशासकीय सुनावण्या खोळंबल्या.जि.प., न.प. पुरवठा शाखेचे विषय ठप्प.राेहयो, सामान्य प्रशासनाची प्रकरणे ठप्प.पीक कर्ज, विमा, शेतकरी प्रकरणे जैसे थे.पाणीटंचाईच्या बाबतीत निर्णय घेणे ठप्प.शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मंदगतीने.

२७ जूनपर्यंत निर्णय होईल....विभागीय आयुक्त पदावर कोण येणार, याचा निर्णय या आठवड्यात होईल. २७ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत या मुद्यावर चर्चा केली जाईल.-अतुल सावे, गृहनिर्माण मंत्री

कामाच्या मर्यादा असतातप्रभारी अधिकाऱ्यांच्या कामाच्या मर्यादा असतात. अनेक प्रशासकीय शाखांच्या सुनावण्यांसाठी विषयाची पृूर्ण माहिती नसते. त्यामुळे निर्णय घेणे शक्य होत नाही.-जगदीश मिणियार, प्रभारी विभागीय आयुक्त

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा