शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

हक्काच्या पाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मराठवाड्याचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:44 PM

जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, हक्काच्या पाण्यासाठी अवघ्या मराठवाड्याचे त्याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देआज सुनावणी : जलतज्ज्ञांच्या मते, मराठवाड्याची बाजू कायदेशीर आणि मजबूत; फक्त योग्य मांडणीची गरज

औरंगाबाद : जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, हक्काच्या पाण्यासाठी अवघ्या मराठवाड्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. मराठवाड्याची बाजू कायदेशीर आणि मजबूत आहे. केवळ ती योग्यरीत्या मांडली गेली पाहिजे, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.प्रारंभी तयारी करण्याच्या नावाखाली आणि नगर, नाशिक जिल्ह्यांत होणाऱ्या विरोधाचे कारण पुढे करून पाणी सोडण्यास विलंब केला गेला. या सगळ्यात जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. तीन सदस्यीय न्यायपीठ बुधवारी सुनावणी करणार आहे. त्यामुळे दोन दिवस जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे निकाल काय लागतो, याकडे मराठवाड्यासह नगर, नाशिक जिल्ह्यांतील जनतेचे लक्ष लागले आहे.गोदावरी आंतरराज्य नदी असल्याने केंद्र शासनाने लवादामार्फत पाण्याची वाटणी करून दिलेली आहे. त्यामुळे पाणी एकाच भागाचे आहे, असे म्हणता येत नाही. पाण्याची समन्यायी वाटणी झालेली आहे. त्यामुळे ही बाब न्यायालयात मांडली पाहिजे. जायकवाडीवरील २३ मोठ्या व मध्यम धरणांत ८७.७० टीएमसी पाणी क्षमता आहे. खरिपातील वापर आणि आजची शिल्लक असे ९६.५० टीएमसी पाणी आहे. त्यातून महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या कायद्याप्रमाणे जायकवाडीसाठी ९ टीएमसी पाणी सोडणे आवश्यक आहे. हे पाणी दिल्यानंतरही वरच्या धरणांत ८७.५० टीएमसी पाणी राहील. त्यामुळे नगर, नाशिकमधून विरोध होता कामा नये, असे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे.पाणी सोडण्यापर्यंत कार्यवाही१५ आॅक्टोबरला हिशोब आणि समन्यायी पाणी वाटप करून ३१ आॅक्टोबरपर्यंत वरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी द्यावे, असा जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने सप्टेंबर २०१४ मध्ये निर्णय दिलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश होते; परंतु एखाद्या धरण समूहातून पाणी सोडण्याची कार्यवाही तांत्रिक अपरिहार्य कारणामुळे ३१ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करणे शक्य झाले नाही तर निर्धारित पाणीसाठा सोडण्यापर्यंत कार्यवाही चालू ठेवावी, असेही आदेश आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या बाजूने निकाल लागण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचा विश्वास जलतज्ज्ञतांनी व्यक्त केला.शासन मराठवाड्याच्या बाजूनेजायकवाडीतील पाण्याचा लाभ ज्यांना मिळतो, ते सध्या काहीही बोलताना दिसत नाहीत. हक्काच्या पाण्यासाठी मराठवाड्याची बाजू मजबूत, कायदेशीर आहे. यावेळी शासनही आपल्या बाजूने आहे. न्यायालयात ते मांडणी करीत आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाला, तर ३१ आॅक्टोबर तारखेची कोणतीही अडचण येणार नाही.- या. रा. जाधव, जलतज्ज्ञतारखेचा मुद्दामहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिलेल्या निर्णयाचा मुद्दा पुढे करून पाणी सोडण्यास स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु गोदावरी नदी ही आंतरराज्य नदी आहे. वरच्या धरणांतून सोडण्यात येणारे पाणी समन्यायी पाणी वाटपाप्रमाणे दिले जात आहे आणि कायद्यानुसार आहे, हे पटवून देण्याची गरज आहे.- शंकर नागरे, जलतज्ज्ञपाणी सोडणे शक्यमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे पाणी सोडावे लागणार आहे, हे गृहीत धरूनच तयारी करण्याची गरज होती. त्यानुसार खूप आधीच पाणी सोडण्याची तयारी केली पाहिजे होती; परंतु पाटबंधारे विभागाने योग्य भूमिका घेतली नाही.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMarathwadaमराठवाडा